Superstar Singer 3 : कोण आहे हा सिलीगुडीचा गायक, ज्याच्या आवाजाने करण जोहरला लावले वेड ?


सोनी टीव्हीचा सिंगिंग रिॲलिटी शो, ‘सुपरस्टार सिंगर’ 18 वर्षांखालील गायकांना एक मोठे व्यासपीठ देत आहे. 9 मार्च 2024 पासून ऑन-एअर झालेल्या या शोच्या सीझन 3 ने पहिल्या एपिसोडपासूनच लोकांची मने जिंकली आहेत. या शोमध्ये सहभागी झालेल्या गायकांचे ऑडिशन व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत आणि या व्हायरल व्हिडिओ क्लिपपैकी एक शुभ सूत्रधारचा आहे. शुभ सूत्रधारने प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक करण जोहरलाही आपल्या गायनाने वेड लावले आहे. करणने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक स्टोरी पोस्ट करून शुभचे कौतुक केले आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते की शुभने त्याचे आवडते गाणे खूप सुंदर गायले आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो की, शुभ सूत्रधार हा पश्चिम बंगालच्या सिलीगुडीचा रहिवासी आहे. सुपरस्टार सिंगरच्या पहिल्या ऑडिशन राउंडमध्ये त्याने रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातील ‘वे कमालिया’ हे गाणे जजसमोर सादर केले. त्याचे गाणे ऐकून नेहा कक्करने लगेचच त्याची पुढील फेरीसाठी निवड केली. यादरम्यान नेहा आणि शोमध्ये सहभागी असलेल्या सुपर कॅप्टनने शुभची थेट तुलना प्रसिद्ध गायक अरिजित सिंगसोबत केली.


‘सुपरस्टार सिंगर’मध्ये सहभागी होण्यासाठी आईसोबत मुंबईत आलेला शुभ हाही एक अप्रतिम संगीतकार आहे. तबला वादनाचे प्रशिक्षण घेऊन त्याने संगीताला सुरुवात केली. पण चार-पाच वर्षांपासून शुभने तबल्याला हात लावला नव्हता. याबाबत बोलताना शुभने सांगितले की, एक गाणे सादर करताना त्याने आपल्या मित्राला त्याची चूक सांगण्याचा प्रयत्न केला, असता त्याच्या मित्राने त्याला उलट उत्तर दिले आणि सांगितले की, आधी स्वतः गाणे शिक आणि नंतर मला सल्ला दे, त्यानंतर शुभने शपथ घेतली होती. एका मोठ्या गायनाच्या कार्यक्रमात निवड झाल्यानंतरच तो तबल्याला स्पर्श करेल आणि ‘सुपरस्टार सिंगर’मध्ये निवड झाल्यानंतर शुभने तबला हातात घेऊन आपली शपथ पूर्ण केली.