हा माणूस फक्त कोक पिऊन आहे जिवंत, 50 वर्षांपासून शरीरात गेला नाही पाण्याचा एक थेंबही, अशी आहे त्याच्या शरीराची अवस्था


निरोगी व्यक्तीसाठी अन्नाइतकेच पाणी महत्त्वाचे असते. याचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की तुमचे शरीर अन्नाशिवाय काही दिवस निरोगी राहू शकते, परंतु पाण्याशिवाय तुम्ही 7 दिवस पण जगू शकत नाही. आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहोत. ज्याने जवळपास पन्नास वर्षे पाणी पिले नाही. या व्यक्तीचे म्हणणे आहे की तो गेली 50 वर्षे फक्त कोका कोला पिऊन जिवंत आहे.

बाहिया, ब्राझील येथे राहणारे 70 वर्षांचे रॉबर्ट पेड्रेरा हे कोका कोलाचे सर्वात मोठे चाहते म्हटले, तर काहीही चुकीचे ठरणार नाही. ऑडिटी सेंट्रल न्यूज वेबसाईटने वृत्त दिले आहे की त्या व्यक्तीने एका मुलाखतीत दावा केला आहे की तो गेल्या 50 वर्षांपासून फक्त कोका-कोला पीत आहे. एवढा कोक प्यायल्यानंतर त्याची अवस्था अशी झाली आहे की त्याला मधुमेह आणि हृदयविकाराचा आजार आहे, तरीही ते कोका कोला पितात.


कोकबद्दलच्या त्याच्या आवडीचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की जेव्हा त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले होते, तेव्हा त्याने तिथल्या डॉक्टरांना स्पष्टपणे सांगितले होते की ते औषध पाण्याने नव्हे तर कोकबरोबरच घेतील. परिस्थिती अशी आहे की त्याच्या हृदयात 6 स्टेंट आहेत. त्यांना हृदयविकाराचा झटकाही आला आहे. पण तो कोणाचेही ऐकत नाही.


आपल्या छंदाबद्दल तो माणूस सांगतो की, त्याला 70 वर्षे झाली आहेत आणि त्याने आपले आयुष्य चांगले जगले आहे आणि आता आपण मेलो तरी कोणाला काही फरक पडणार नाही. इथे आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती व्यक्ती आईस्क्रीम खातानाही कोक पिते. जेव्हा या व्यक्तीची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली, तेव्हा अनेकांना तो खोटे बोलत असल्याचे वाटले, परंतु जेव्हा रॉबर्टच्या 27 वर्षांच्या नातवाने सांगितले की, त्याने आजोबांना पाणी पिताना कधीच पाहिले नाही, तेव्हा जगाने त्यावर विश्वास ठेवण्यास सुरुवात केली.