VIDEO : उलटे धावत असा कोण घेतो झेल? शुभमन गिलने संघाला विकेट मिळवून देण्यासाठी केली अप्रतिम कामगिरी


ते गाणे ऐकले आहे की नाही? दौडा दौडा भागा भागा सा. धर्मशाला कसोटीच्या पहिल्या दिवशी एका हिंदी चित्रपटातील गाण्यातील ही ओळ शुबमन गिललाही चांगलीच शोभणारी वाटली. झाले असे की, इंग्लंडचे सलामीवीर अर्धशतकी भागीदारी करून त्याला मोठा रंग देण्याचा प्रयत्न करत होते. म्हणजे टीम इंडियाला विकेटची आस लागली होती. भारतीय गोलंदाज प्रयत्न करत होते, मात्र त्यांना विकेट घेण्यात यश मिळत नव्हते. अशा परिस्थितीत बेन डकेटने संधी देताच शुबमन गिलने त्याचा फायदा घेण्यासाठी उलटी धाव घेतली. त्यामुळे भारताला पहिले यश मिळाले.


इंग्लंडच्या पहिल्या डावातील 18व्या षटकात असे घडले की कुलदीप यादवचा एक चेंडू बेन डकेटच्या बॅटची कड घेऊन थेट हवेत गेला. मात्र, चेंडू क्षेत्ररक्षकापासून लांब पडत असल्याचे दिसत होते. पण शुबमन गिलने तिथे चपळाई दाखवली आणि तो चेंडूवर नजर ठेवून तो पकडण्यासाठी विरुद्ध दिशेने धावला. मग शेवटी झेप घेऊन त्याने झेल पकडला. गिलचा हा झेल टीम इंडियाला किती दिलासा देणारा होता, हे कर्णधार रोहित शर्मा आणि त्याच्यासोबत सेलिब्रेशन करणाऱ्या इतर भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यांवरून स्पष्टपणे दिसून येते.

गिलच्या झेलमुळे कुलदीप यादवने 27 धावा करून बाद झालेल्या बेन डकेटची विकेट घेतली. डकेटने बाद होण्यापूर्वी क्रॉलीसोबत 64 धावांची भागीदारी केली. या मालिकेतील डकेट आणि क्रॉली यांच्यातील ही 5वी अर्धशतकी भागीदारी होती.