रणबीर कपूरच्या ‘रामायण’साठी गदर 2 च्या बजेटपेक्षा अडीच पट जास्त मानधन घेणार यश?


नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’च्या चर्चा थांबत नाहीत. या चित्रपटाशी संबंधित नवनवीन बातम्या रोज समोर येत आहेत. या चित्रपटाच्या स्टारकास्टपासून ते स्टार्सच्या मानधनापर्यंत सर्वच गोष्टींबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटात रणबीर कपूर भगवान राम, सई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत आणि साऊथ स्टार यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटातील उर्वरित पात्रांसाठीही एक उत्तम टीम तयार केली जात आहे. दरम्यान, चित्रपटाशी संबंधित एक अपडेट समोर आले आहे की, साऊथ स्टार यशने ‘रामायण’साठी अडीच पट जास्त मानधनाची मागणी केली आहे.

KGF आणि KGF 2 नंतर साऊथचा सुपरस्टार यशची फॅन फॉलोइंग खूप वाढली आहे. आता प्रेक्षक अभिनेत्याच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत. बॅक टू बॅक ब्लॉकबस्टर चित्रपट दिल्यानंतर यशने आता त्याचे मानधन अडीच पट वाढवले आहे. अभिनेत्याने आपले मानधन खूप वाढवले आहे. इतकेच नाही, तर सुपरस्टार यश कन्नड इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता बनला आहे. नितेश तिवारीच्या रामायणातील रावणाच्या भूमिकेसाठी यशने 400% जास्त मानधन मागितल्याचे मानले जाते.

Odishatv.in ने दिलेल्या वृत्तानुसार, यश रामायणाच्या तीनही भागांसाठी नितेश तिवारी यांच्याशी सतत चर्चा करत आहे. साउथ सुपरस्टारने निर्मात्यांकडे 150 कोटी रुपयांची मागणी केली आहे. म्हणजेच यशने प्रत्येक भागासाठी 50-50 कोटी रुपयांची मागणी केली आहे. यशची ही मागणी त्याच्या आधीच्या KGF 2 चित्रपटापेक्षा पाचपट जास्त आहे. या चित्रपटासाठी त्याने 30 कोटी रुपये घेतले होते.

यशच्या मानधनाच्या बातमीने इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे. साऊथ स्टार जेवढी मागणी करत आहेत, तेवढ्याच पैशांमध्ये सनी देओलचा ब्लॉकबस्टर गदर 2 दोनदा बनवता येईल. गदर 2 च्या बजेटबद्दल सांगायचे तर, सनी देओलच्या चित्रपटासाठी निर्मात्यांनी 60 कोटी रुपये खर्च केले होते. म्हणजे यश गदर 2 च्या बजेटपेक्षा अडीच पट जास्त पैसे घेणार आहे.