Shaitaan : रिलीज होण्याच्या अवघ्या 4 दिवस आधी विकली गेली शैतानची इतकी तिकिटे, पहिल्या दिवशी होईल किती कमाई ?


अजय देवगणच्या शैतान या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून वातावरण तयार झाले आहे. त्याच्या या चित्रपटाबद्दल चाहत्यांना उत्सुकता आहे. या चित्रपटातून साऊथ आणि बॉलीवूडचे दोन मोठे स्टार्स एकत्र दिसणार असल्याचीही उत्सुकता आहे. या चित्रपटात एकीकडे अजय देवगण लीड रोलमध्ये आहे, तर दुसरीकडे आर माधवन नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची वाढती क्रेझ त्याच्या आगाऊ बुकिंगवरूनच लक्षात येते. आगाऊ बुकींगच्या आधारे, चित्रपट ओपनिंगच्या दिवशी किती कमाई करू शकतो, हे जाणून घेऊया.

चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगबद्दल बोलायचे झाले तर, सोमवारी म्हणजेच बुकिंगच्या पहिल्या दिवशी चित्रपटाची एकूण 7700 तिकिटे विकली गेली आहेत. एकीकडे चित्रपटाची 6100 तिकिटे पीव्हीआरमध्ये विकली गेली आहेत, तर दुसरीकडे सिनेपोल्सिमध्ये चित्रपटाची 1600 तिकिटे विकली गेली आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी अजून 4 दिवस बाकी आहेत. अशा स्थितीत तिकीट विक्रीच्या या आकड्यांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला, तर पहिल्या दिवशीही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकतो. पहिल्या दिवशी हा चित्रपट 40 ते 50 कोटींची कमाई करू शकतो, असा अंदाज आहे.

या चित्रपटासोबत इतर कोणतेही मोठे चित्रपट प्रदर्शित होत नसल्याचा फायदाही या चित्रपटाला होऊ शकतो. तसेच, सध्याच्या काळात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये, यामी गौतमचा आर्टिकल 370 वगळता, कोणताही चित्रपट मोठ्या प्रमाणावर आश्चर्यकारक कामगिरी करताना दिसत नाही आहे. यामीच्या आर्टिकल 370 ला देखील शैतानला धोका नाही, तर येणाऱ्या काळात शैतानच आर्टिकल 370 चा खेळ खराब करू शकतो.

हा चित्रपट 8 मार्च 2024 रोजी महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट काळी जादू आणि तांत्रिक घटनांपासून प्रेरित आहे. चित्रपटाच्या टायटल ट्रॅकलाही खूप पसंती दिली जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे. त्यात ज्योतिका आणि पलक लालवानी या कलाकारांचाही समावेश आहे.