टेलिग्रामवर 8000 रुपयांना उपलब्ध आहे iPhone, तो विकत घ्याचा की नाही?


आजकाल टेलीग्रामवरही योजना आणि ऑफर्सची जाहिरात केली जाऊ लागली आहे. ग्रुप चॅटवर अनेक प्रकारची कार्ड्स आणि लिंक्स शेअर केल्या जातात, ज्यामध्ये फोन ऑफर्सचा तपशील दिला जातो. यातील सर्वात आकर्षक ऑफर म्हणजे स्वस्त दरात आयफोन मिळवण्याच्या ऑफर्स. जर तुम्हालाही असा मेसेज आला, तर ऑर्डर करण्यापूर्वी सावध व्हा.

आयफोन डिस्काउंट ऑफर टेलिग्रामवर अतिशय हुशारीने शेअर केल्या जात आहेत. एका चित्रानुसार, 8 हजार रुपयांमध्ये आयफोन आणि 4 ते 5 हजार रुपयांमध्ये गुगल पिक्सेल आणि इतर प्रीमियम दर्जाचे स्मार्टफोन मिळतील, असा दावा केला जात आहे. या ऑफर पूर्णपणे खोट्या आहेत. लक्षात ठेवा की ऑनलाइन ऑफर आयफोन किंवा इतर स्मार्टफोनवर नक्कीच उपलब्ध आहेत परंतु प्रीमियम डिव्हाइसेस इतक्या स्वस्त किमतीत मिळणे शक्य नाही. हे निव्वळ फसवणुकीचे प्रकरण आहे, त्यामुळे अशा ऑफर्सपासून दूर राहा.


सायबर दोस्तने एक्स-हँडलवर अलर्ट करणारी पोस्ट केली आहे. त्यात असे म्हटले आहे की टेलिग्रामवरील कार्डिंग योजना स्वस्त आयफोन विकण्याचे आश्वासन देऊन लोकांना आकर्षित करत आहेत, परंतु ही फसवणूक असू शकते. तुम्ही एखाद्या घोटाळ्यात अडकू शकता.

टेलिग्रामवर 8000 रुपयांमध्ये उपलब्ध असलेला आयफोन खरेदी करणे धोकादायक ठरू शकते. ही फसवणूक असू शकते. हे देखील शक्य आहे की तुम्ही आयफोनसाठी पैसे दिले आणि तुम्हाला आयफोन मिळाला नाही. जर विक्रेता तुमच्यावर ताबडतोब पैसे पाठवण्यासाठी दबाव आणत असेल, तर ती फसवणूक असू शकते.

स्वस्त दरात विकला जाणारा आयफोन सदोष किंवा चोरीचाही असण्याची शक्यता आहे. तसेच, अशा उपकरणांवर कोणतीही वॉरंटी किंवा रिटर्न पॉलिसी असणार नाही.