रणजी ट्रॉफी सोडून हार्दिक पांड्यासोबत जिम करत आहे इशान किशन, उचलले 140 किलो वजन


टीम इंडियातून बाहेर असलेला यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन आता थेट इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये दिसणार आहे. इशान किशन दक्षिण आफ्रिका दौरा अर्धवट सोडून परतला होता, तेव्हापासून तो टीम इंडियातून बाहेर आहे. टीम इंडिया आणि बीसीसीआयने वारंवार त्याला रणजी ट्रॉफी खेळण्यास सांगितले होते, मात्र इशान किशनने या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले असून, या दरम्यान तो समोर आला आहे.

इशान किशनने गुरुवारी एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये तो हार्दिक पांड्यासोबत जिममध्ये घाम गाळताना दिसत आहे. इशान किशन आणि हार्दिक पांड्या जिम करत आहेत, इथे हार्दिकने ईशानला जास्त वजन उचलण्याचे आव्हान दिले आहे. दोघांमध्ये मस्ती सुरू आहे आणि इशान किशन त्याचवेळी 130-140 किलो वजन उचलतो.


ईशान किशन आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो आणि आता हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे. अशा परिस्थितीत जेव्हापासून इशान किशन टीम इंडियाच्या रडारच्या बाहेर आहे, तेव्हापासून तो हार्दिक पांड्यासोबत आहे. यामुळेच तो रणजी ट्रॉफीमध्येही सहभागी होऊ शकला नाही, तर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, प्रत्येक खेळाडूला रणजी ट्रॉफी खेळावी लागेल.

इशान किशनबद्दल बोलायचे झाले, तर तो दक्षिण आफ्रिका दौरा सोडून भारतात आला होता. त्यानंतर त्याने टीम इंडियाशी कोणताही संपर्क न ठेवल्याने टीम इंडियाचे व्यवस्थापन आणि बोर्डाचे अधिकारी इशान किशनच्या या वागण्यावर नाराज होते. वारंवार आवाहन करूनही इशान किशन रणजी ट्रॉफी खेळायला गेला नाही आणि आता तो थेट आयपीएलची तयारी करताना दिसत आहे. म्हणजेच आयपीएलमध्ये पुनरागमन करण्याची त्याची आशा आहे.