विद्या बालनचे बनावट इंस्टाग्राम अकाउंट बनवून मागितले जात आहेत पैसे, आता अभिनेत्रीने दाखल केली एफआयआर


बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्याचे कारण तिचे कोणतेही चित्रपट नसून बनावट इंस्टाग्राम अकाउंट हे आहे. नुकतेच विद्या बालनच्या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे. यानंतर तिच्या नावावर लोकांकडून पैसेही मागितले जात होते. दरम्यान, अभिनेत्रीने एका अज्ञात व्यक्तीविरोधात मुंबई पोलिसात एफआयआर दाखल केला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने सर्वप्रथम विद्या बालनच्या नावाने इन्स्टाग्राम आयडी बनवला. यानंतर जीमेल अकाउंटही तयार करण्यात आले. या दोन अकाऊंटच्या माध्यमातून बॉलीवूडशी संबंधित लोकांशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता. विद्या बालनच्या नावावर सातत्याने फसवणूक केली जात असल्याचे आढळून आले आहे.

नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार विद्या बालनच्या नावाने एक फेक अकाउंट तयार करण्यात आले आहे. ही अज्ञात व्यक्ती नोकरीचे आश्वासन देऊन लोकांकडे पैशांची मागणी करत होता. मात्र, ही माहिती विद्या बालनपर्यंत पोहोचताच तिच्या नावाने बनावट खाते सुरू असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे अभिनेत्रीने यावर तातडीने कारवाई केली. याप्रकरणी विद्या बालनने मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे.

वास्तविक, आयटी कायद्याच्या कलम 66 (सी) अंतर्गत खार पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याचा तपासही सुरू करण्यात आला आहे. या अज्ञात व्यक्तीबाबत सध्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, तिने आपल्या चाहत्यांना अशा बनावट अकाऊंटपासून सावध राहण्यास सांगितले आहे. हे काही पहिले प्रकरण नाही. याआधीही अनेक स्टार्सच्या नावाने फेक अकाउंट तयार करण्यात आले आहेत. त्याचबरोबर लोकांकडून पैशांची मागणीही केली जात होती.

गेल्या काही दिवसांपासून विद्या बालन तिच्या आगामी ‘भूल भुलैया 3’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. मंजुलिकाने चित्रपटात प्रवेश केला आहे. अशा परिस्थितीत ती सर्वत्र ट्रेंड करत आहे. याचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. मात्र ही बाब वेळीच उघडकीस आली. आता पोलिसांकडून तपास सुरू आहे.