VIDEO : बाबरने एका हाताने मारले 2 षटकार, 26 चेंडूत केल्या 83 धावा, अवघ्या 7.1 षटकात संघाने जिंकला सामना


क्रिकेट सामन्यांमध्ये तुम्ही एकापेक्षा एक खेळी पाहिल्या असतील. काही फलंदाज काही मिनिटांत अर्धशतक पूर्ण करतात, तर काही खेळाडू फार कमी चेंडूत शतके ठोकतात. 6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा पराक्रमही अनेक फलंदाजांनी केला आहे. पण मुहम्मद बाबर नावाच्या फलंदाजाने मैदानावर असा पराक्रम केला आहे, जो कदाचित फार कमी लोकांनी पाहिला असेल. स्पेनकडून खेळताना मुहम्मद बाबरने झेक प्रजासत्ताकविरुद्ध झंझावाती खेळी करत 86 धावा केल्या. त्याने आपल्या 26 चेंडूंच्या खेळीत 9 षटकार मारले, परंतु आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे यातील दोन षटकार त्याने फक्त एका हाताने मारले.


मुहम्मद बाबरने झेक प्रजासत्ताक विरुद्ध सागर हुसेनच्या 7व्या षटकात दोन षटकार मारले आणि हे दोन्ही षटकार त्याने एका हाताने मारले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बाबर सुरुवातीपासून एका हाताने बॅट पकडत होता. बाबरने हे दोन्ही षटकार मिड-विकेट भागात मारले. बाबरने हे षटकार कमकुवत गोलंदाजांविरुद्ध मारले आहेत, असे तुम्हाला वाटत असेल, पण येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे गोलंदाज कोणताही असो, एका हाताने षटकार मारण्यासाठी विशेष कौशल्य असणे आवश्यक आहे. त्यामुळेच बाबरच्या या दोन षटकारांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुहम्मद बाबरच्या झंझावाती खेळीच्या जोरावर स्पेनने झेक प्रजासत्ताकचा 9 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना चेक प्रजासत्ताकने 10 षटकांत 117 धावा केल्या. प्रत्युत्तरात स्पेनने अवघ्या 7.1 षटकांत सामना जिंकला. बाबरने 319 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने नाबाद 83 धावा केल्या आणि संघाला विजयापर्यंत नेले. स्पेन आणि चेक प्रजासत्ताक यांच्यात पाच सामन्यांची T10 मालिका सुरू होती आणि बाबरच्या स्फोटक खेळीच्या जोरावर त्याच्या संघाने पाचही सामने जिंकले. बाबरने 3 सामन्यात 83.50 च्या सरासरीने 167 धावा केल्या, ज्यात त्याच्या बॅटमधून 17 षटकार आणि 12 चौकार आले.