लसूण जास्त खाल्ल्याने हार्ट बर्न आणि कमी रक्तदाबाचा धोका वाढतो! दररोज किती खावे ते जाणून घ्या


शतकानुशतके भारतीय स्वयंपाकघरात लसूण वापरला जात आहे. लसूण केवळ आपल्या जेवणाची चवच वाढवत नाही, तर त्याचा घरगुती उपाय म्हणूनही उपयोग केला जातो. आयुर्वेदानुसार लसणाचा उपयोग अनेक आजार दूर करण्यासाठी केला जातो. अर्थात लसूण हे चवदार किंवा आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी त्याचे तोटेही आहेत.

तुम्हीही लसणाचा जास्त वापर करत असाल, तर काळजी घेणे आवश्यक आहे. हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, लसूण जास्त प्रमाणात खाल्ल्याने रक्त पातळ होण्याची समस्या देखील होऊ शकते. लसूण रोज खाणे किती फायदेशीर आहे आणि जास्त खाण्याचे तोटे काय आहेत हे जाणून घेऊया.

कमी रक्तदाब
उच्च रक्त नियंत्रणात ठेवण्यासाठी कच्चा लसूण खाणे फायदेशीर आहे. पण जास्त दिवस रोज खाल्ल्यास रक्तदाब कमी होण्याची भीती असते. यामुळे तुम्हाला चक्कर येण्यासारख्या समस्याही जाणवू शकतात. त्यामुळे कच्चा लसूण मर्यादित प्रमाणातच खा.

पचन
आयुर्वेदानुसार लसणाचा स्वभाव उष्ण असतो. यामुळेच लसूण जास्त प्रमाणात खाल्ल्याने पचनाच्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस आणि ब्लोटिंगची समस्याही उद्भवू शकते.

हार्ट बर्न
लसूण हे गरम स्वभावाचे असल्याने ते खाल्ल्याने पोटातील ऍसिडिटीची समस्या वाढू शकते. याशिवाय ज्यांना आधीच गॅसची समस्या आहे, त्यांनी लसूण खाऊ नये. त्यामुळे हार्ट बर्नची समस्या उद्भवू शकते.

रक्तस्त्राव
कच्चा लसूण जास्त खाल्ल्याने आपले रक्त पातळ होते. लसणात रक्त पातळ करणारे घटक असतात. जर तुम्ही अशी औषधे घेत असाल, तर कच्चा लसूण न खाणे चांगले.

किती खावी लसूण
लसणाच्या एक किंवा दोन पाकळ्या रोज खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण यापेक्षा जास्त लसूण तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही