न्यूझीलंडचा खेळाडू पक्ष्याप्रमाणे उडाला हवेत, व्हिडिओ पाहिल्यानंतर विराट आणि आरसीबीला होईल आनंद


न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना. या सामन्याच्या चौथ्या डावात न्यूझीलंड संघाला चौथ्या डावात विजयासाठी 267 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. पण या सामन्यात असे काही पाहायला मिळाले, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आणि आपण ज्या सीनबद्दल बोलत आहोत, तो ग्लेन फिलिप्सचा झेल आहे. फिलिप्सचा हा झेल इतका प्रेक्षणीय होता की त्याची सर्वत्र चर्चा आहे.


फिलिप्सने हा झेल दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात पकडला. डेव्हिड बेडिंगहॅम आणि कीगन पीटरसन यांच्यात चांगली भागीदारी झाली. या दोन फलंदाजांनी मिळून 98 धावा जोडल्या होत्या. त्यानंतर डावाचे 60 वे षटक येते. मॅट हेन्रीच्या एका चेंडूवर पीटरसनने कट शॉट खेळला. मग गलीमध्ये उभ्या असलेल्या फिलिप्सने हवेत उडत उत्कृष्ट डाईव्ह मारली. फिलिप्सच्या डाईव्हमुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले, कारण तो हवेत उडत आहे, असे वाटत होते. आणि यासह त्याने पीटरसनचा अप्रतिम झेल घेतला.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या डावात 235 धावांवर ऑलआऊट झाला आणि त्यांनी न्यूझीलंडला 267 धावांचे लक्ष्य दिले. मात्र, न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली आणि सलामीवीर डेव्हॉन कॉनवे केवळ 17 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. इथून न्यूझीलंडला विजयासाठी 227 धावांची गरज असून त्यांच्याकडे 9 विकेट आहेत. धावसंख्या लहान आहे, पण न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजीला साथ देणाऱ्या खेळपट्ट्यांवर ते कठीण आहे.