BAPS मंदिराच्या उद्घाटनाला पोहचला ‘जेठालाल’ दिलीप जोशी, म्हणाला- हा देवाचा चमत्कार..


अबुधाबी, संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी BAPS च्या पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन केले. 27 एकरांवर बांधलेल्या या सुंदर मंदिरासाठी सुमारे 7000 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या उद्घाटन सोहळ्यात देशातील अनेक प्रसिद्ध चेहरे सहभागी झाले होते. तारक मेहता का उल्टा चष्मा फेम दिलीप जोशी म्हणजेच जेठालाल हे देखील अबुधाबी येथे झालेल्या भव्य उद्घाटन समारंभाचा भाग बनले. या विशेष प्रसंगी, त्यांनी मंदिराच्या बांधकामासाठी परवानगी दिल्याबद्दल दुबईच्या शासक (दुबईचा राजा) यांचे कौतुक केले.

एएनआयशी बोलताना दिलीप जोशी म्हणाले, आज हे मंदिर पाहिल्यानंतर या ठिकाणी इतके सुंदर BAPS मंदिर बांधले गेले आहे, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंदिराची पायाभरणी केली, तेव्हा मी देखील येथे उपस्थित होतो. दुबईचा शासक (राजा) खूप दयाळू मनाचा आहे, असे मला नक्कीच म्हणायचे आहे. त्यांनी या मंदिराच्या बांधकामाला परवानगी तर दिलीच, पण चांगली जागाही दिली. हा खरोखरच देवाचा चमत्कार आहे.


दिलीप जोशी पुढे म्हणाले, या मंदिरातून समरसतेचा संदेश जगभर पोहोचावा, हीच माझी प्रार्थना आहे. बुधवार, 14 फेब्रुवारी 2024 रोजी अबुधाबी येथे झालेल्या कार्यक्रमात दिलीप जोशीच नाही, तर अभिनेता अक्षय कुमारपासून ते विवेक ओबेरॉय आणि गायक-संगीतकार शंकर महादेवनपर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते. हे पहिले हिंदू मंदिर अबुधाबीमध्ये बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेने (BAPS) बांधले आहे.

या मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, हे मंदिर जगासाठी एकता आणि सौहार्दाचे प्रतीक असेल. या मंदिराच्या उभारणीत यूएई सरकारच्या भूमिकेचेही त्यांनी कौतुक केले. यादरम्यान पीएम मोदींनी विश्वासही व्यक्त केला की येत्या काळात हजारो प्रवासी हे मंदिर पाहण्यासाठी अबुधाबीला येतील.