Shocking Video : खेळाडूच्या डोक्यावर पडली वीज, त्याला मैदानातच गमवावा लागला जीव, फुटबॉल सामन्यादरम्यान घडला भीषण अपघात


इंडोनेशियात एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे. हा एक असा व्हिडिओ आहे, जो प्रत्येकाला भान हरपवून टाकायला लावेल आणि दहशत वाटेल. इंडोनेशियातील बांडुंग येथे फुटबॉल सामन्यादरम्यान विजेच्या धक्क्याने एका खेळाडूचा मृत्यू झाला. खराब हवामानात खेळल्या जात असलेल्या एका सामन्यात या खेळाडूच्या डोक्यावर अचानक वीज पडली आणि तो मैदानावर पडला. या अपघाताने मैदानावर उपस्थित खेळाडूंना धक्का बसला. इतकंच नाही, तर या घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यातही रेकॉर्ड झाला असून आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

इंडोनेशियन मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना शनिवारी, 10 फेब्रुवारी रोजी घडली, जेव्हा बांडुंगमधील सिलीवांगी स्टेडियममध्ये दोन स्थानिक क्लबमध्ये फुटबॉल सामना सुरू होता. सामना सुरू होऊन जेमतेम 15 मिनिटे झाली होती, तेव्हा हवामान खराब होऊ लागले. पाऊस पडत नसला, तरी आभाळ ढगाळ होऊ लागले होते आणि मग पहिल्यांदा विजांचा कडकडाट झाला. त्यावेळी कोणतीही दुर्घटना घडली नाही, मात्र पुढच्याच सेकंदात दुसऱ्यांदा वीज चमकली आणि यावेळी एकाचा बळी गेला.


या घटनेच्या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की फुटबॉल मॅच सुरू असताना अचानक विजेचा कडकडाट होऊन मैदानाच्या एका भागात उभ्या असलेल्या एका खेळाडूवर विजेचा कडकडाट झाला, त्यानंतर आगही बाहेर आली. ज्या खेळाडूवर वीज पडली, तो त्याच वेळी मैदानावर पडला, तर आवाज आणि स्फोटापासून काही अंतरावर उभा असलेला दुसरा खेळाडूही पडला. इतर काही खेळाडू स्वत:ला वाचवण्यासाठी खाली वाकले, तर काही धावू लागले.

काही सेकंदातच, जे घडले ते सर्वांच्या लक्षात आल्यावर ते बेशुद्ध पडलेल्या त्याच्या सोबत्याकडे धावले आणि त्यांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. अहवालानुसार, 30 वर्षीय खेळाडूला रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

त्यानंतर, या घटनेचा व्हिडिओ ‘एक्स’ आणि इंस्टाग्रामवर व्हायरल झाला आणि तो पाहिल्यानंतर प्रत्येकजण घाबरला आहे. अनेकदा वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तींचा फटका बसलेल्या इंडोनेशियामध्ये खेळाडूंना विजेचा धक्का बसण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी 2023 मध्येही एका टूर्नामेंटदरम्यान अशा काही घटना घडल्या होत्या, ज्यामध्ये एक खेळाडू वाचला होता, पण दुसऱ्या सामन्यात दुसऱ्या खेळाडूचा मृत्यू झाला होता.