Kaagaz 2 : हा होता सतीश कौशिक यांचा शेवटचा प्रोजेक्ट, तो शेअर करताना त्यांचा जिवलग मित्र अनुपम खेर झाला भावूक


दिवंगत अभिनेते सतीश कौशिक आता आपल्यात नाहीत. पण, त्यांनी आपल्या चित्रपटातून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. 9 मार्च 2023 रोजी त्यांनी इंडस्ट्री तसेच संपूर्ण जगाचा निरोप घेतला. त्यांच्या मृत्यूचे गूढ बरेच दिवस उकललेले नव्हते. त्यांचा जिवलग मित्र असलेले अभिनेते अनुपम खेर त्यांच्या जाण्याने उद्ध्वस्त झाले. आता नुकताच सतीश कौशिकच्या शेवटच्या प्रोजेक्टचा फर्स्ट लुक पोस्ट रिलीज झाला आहे.

अनुपम खेर यांनी त्यांचा मित्र सतीश कौशिकच्या शेवटच्या चित्रपटाचे पोस्टर त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर केले आहे. 7 जानेवारी 2011 रोजी सतीश कौशिक लिखित आणि दिग्दर्शित ‘कागज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Zee5 वर प्रसारित झाला. या विनोदी चित्रपटाला लोकांचे भरभरून प्रेम मिळाले. आता त्याच्या सिक्वेलचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. जो सतीश कौशिक यांचा शेवटचा प्रोजेक्ट होता. दुर्दैवाने अभिनेता तो पाहू शकला नाही.


सतीश कौशिक यांच्या चित्रपटाच्या पहिल्या भागात पंकज त्रिपाठी महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. आता अनुपम खेर यांनी ‘कागज 2’ च्या दुसऱ्या भागाचे पहिले पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. पोस्टरसोबतच्या कॅप्शनमध्ये त्यांनी चित्रपटाचा ट्रेलर कधी रिलीज होणार हेही सांगितले आहे. हे पोस्टर शेअर करताना अनुपम यांनी आपल्या मित्रासाठी एक भावनिक चिठ्ठीही लिहिली आहे.

अनुपम खेर यांनी कॅप्शनमध्ये लिहिले – “प्रिय सतीश कौशिक. तुमच्या पॅशन प्रोजेक्टचा ट्रेलर आणि दुर्दैवाने शेवटचा प्रोजेक्ट ‘कागज 2’ उद्या रिलीज होत आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी तुम्ही किती मेहनत घेतली, हे मला माहीत आहे, पण आता या चित्रपटाची शान संपूर्ण जगापर्यंत पोहोचेल, याची आम्ही सर्वजण खात्री करून घेऊ. तुझ्यावर नेहमी प्रेम करतो.” अनुपम खेर यांच्या पोस्टरनुसार, या चित्रपटाचा ट्रेलर आज म्हणजेच 9 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे.