Box Office Prediction : शाहिद कपूरचा चित्रपट पहिल्याच दिवशी करेल धमाका, या एकाच गोष्टीवर सगळी अवलंबून आहे कमाई


बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन यांचा ‘तेरी बातों में उल्झा जिया’ हा चित्रपट आज थिएटरमध्ये दाखल झाला आहे. या चित्रपटाची चाहत्यांना खूप उत्सुकता होती. या चित्रपटाच्या माध्यमातून शाहिद आणि क्रिती पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. दोघांच्या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. त्यामुळे या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवरही चांगला प्रतिसाद मिळेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

ॲडव्हान्स बुकिंगच्या बाबतीतही हा चित्रपट चांगला व्यवसाय करत असल्याचे दिसून आले. अशा परिस्थितीत शाहिदचा चित्रपट पहिल्याच दिवशी किती व्यवसाय करेल, यावर सर्वसामान्यांपासून ते व्यापार विश्लेषकांपर्यंत सगळेच ‘तेरी बातों में उल्झा जिया’बाबत आपापले अंदाज बांधत आहेत. सकनिल्कच्या रिपोर्टनुसार, शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉनचा ‘तेरी बातों में उल्झा जिया’ चित्रपट पहिल्या दिवशी 6 ते 7 कोटींचा व्यवसाय करू शकतो. आगाऊ बुकिंग लक्षात घेऊन हे आकडे ठरवण्यात आले आहेत.

मात्र, व्हॅलेंटाइन वीकचा पुरेपूर फायदा या चित्रपटाला मिळू शकतो, असेही मानले जात आहे. ही एक कॉमेडी लव्हस्टोरी असल्याने प्रेक्षक थिएटरमध्ये जाऊन ती बघू शकतात. चित्रपटाची माउथ पब्लिसिटी अधिक चांगली राहिली, तर ‘तेरी बातों में उल्झा जिया’ चित्रपट आठवड्याच्या अखेरीस 27 ते 30 कोटींचा आकडा पार करेल, असेही बोलले जात आहे. म्हणजे आता सर्व प्रकरण जनतेच्या पसंतीवर अवलंबून आहे. जर त्यांना पहिल्याच दिवशी हा चित्रपट आवडला तर त्याच्या कमाईत मोठी झेप पडू शकते.

शाहिद कपूरचा शेवटचा चित्रपट जर्सी होता. या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर 2.93 कोटींचा व्यवसाय केला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्याचा आणखी एक चित्रपट बत्ती गुल मीटर चालूने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 6.50 कोटींची कमाई केली होती. मात्र, या आकडेवारीमुळे निर्मात्यांची निराशा झाली. रंगून या चित्रपटाने पहिल्या दिवशी 5.05 कोटींची कमाई केली होती. ‘तेरी बातों में उल्झा जिया’ चित्रपटाने अंदाजानुसार व्यवसाय केला, तर तो या चित्रपटांना मागे टाकू शकतो.