अमिताभ-दीपिका-कमल हसननंतर प्रभासच्या कल्की 2898 मध्ये आणखी तीन सुपरस्टार्सची एन्ट्री! बॉक्स ऑफिसवर होणार तुफान धमाल


प्रभासच्या आगामी ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पादुकोण, अमिताभ बच्चन आणि कमल हासन देखील दिसणार आहेत. याचा अर्थ या चित्रपटासाठी चार मोठे स्टार्स आधीच ठरले आहेत. आता या चित्रपटात आणखी तीन मोठे स्टार्स दिसणार असल्याचे बोलले जात आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, विजय देवरकोंडा देखील या चित्रपटात छोट्या भूमिकेत दिसणार आहे. त्यांच्याशिवाय आणखी दोन नावांची चर्चा होत आहे.

ती इतर दोन नावे ज्युनियर एनटीआर आणि नानी यांची आहेत. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर परशुरामच्या भूमिकेत दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नानीबद्दल असे बोलले जात आहे की तो क्लायमॅक्सच्या आधी दिसणार असून त्याची भूमिका कृपाचार्य असेल. मात्र, याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण असे झाले तर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालू शकतो, कारण एका चित्रपटात इतके मोठे स्टार असणे ही एक मोठी गोष्ट आहे.

या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दल बोलायचे झाले, तर हा चित्रपट ८ मे ला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. दिग्दर्शनाची जबाबदारी नाग अश्विन सांभाळत असून सी. अश्विनी दत्त निर्माते आहेत. चित्रपटाची कथा भारतीय पौराणिक कथांवर आधारित असणार आहे.

कल्की 2898 एडी बद्दल सांगितले जात आहे की हा एक बिग बजेट चित्रपट असणार आहे. तो बनवण्यासाठी निर्माते पाण्यासारखा पैसा खर्च करत आहेत. रिपोर्टनुसार, चित्रपटाचे बजेट जवळपास 600 कोटी रुपये आहे. आता हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कोणते वातावरण निर्माण करतो हे पाहायचे आहे.