VIDEO : रोहित शर्माची जागा घेण्यासाठी हार्दिक पांड्या करत आहे जमीन आसमान एक!


हार्दिक पांड्या क्रिकेट क्षेत्रापासून दूर असला, तरी तो सतत चर्चेत असतो. टीम इंडियाचा हा क्रिकेटर सध्या त्याच्या फिटनेसवर खूप मेहनत घेत आहे आणि त्याचा दुखापतीतून बरा होण्याचा कालावधी आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. हार्दिक पांड्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो त्याच्या फिटनेसवर मेहनत करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये, त्याने त्याची वर्कआउट रूटीन देखील चाहत्यांसोबत शेअर केली, जी खूप कठीण आहे. पांड्याला आयपीएल 2024 मध्ये कोणत्याही परिस्थितीत पुनरागमन करावे लागेल, कारण त्याला मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. फ्रँचायझीने रोहितच्या जागी पांड्याकडे कर्णधारपद सोपवले आहे.

हार्दिक पांड्याने त्याच्या वर्कआउटचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये तो शर्टलेस प्रशिक्षण घेत आहे. पांड्याच्या वर्कआउट रूटीनची खास गोष्ट म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंगऐवजी तो त्याच्या शरीराच्या वेगावर आणि लवचिकतेवर अधिक काम करत आहे. त्यामुळेच त्याचे वेळापत्रक इतर खेळाडूंपेक्षा थोडे वेगळे आहे.


पांड्याचा दिनक्रम हा हाय इंटेन्सिटी वर्कआउटचा भाग आहे. ज्यामध्ये तो 15 सेकंद बाइकवर स्प्रिंट करतो, त्यानंतर तो दोरीवरुन उड्या मारतो. बॅटल रोपशिवाय तो स्किपिंगसारखे व्यायामही करत आहे. एकंदरीत ही कसरत हार्दिक पांड्याचा स्टॅमिनाही वाढवत आहे.

मुंबई इंडियन्सला विजय मिळवून देण्यासाठी आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी पांड्या खूप मेहनत घेत आहे. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्सकडून 17 कोटी रुपयांना खरेदी केले आहे. गेल्या दोन हंगामात पांड्या गुजरात टायटन्सचा कर्णधार होता आणि एकदा त्याने संघाला चॅम्पियन बनवले आणि दुसऱ्या सत्रात संघ अंतिम फेरीत पोहोचला. पांड्याच्या आयपीएल करिअरची सुरुवात मुंबई इंडियन्समधून झाली पण संघाने त्याला सोडले. आता पुन्हा एकदा पांड्या मुंबईत परतला आहे, आता हा अष्टपैलू खेळाडू काय करू शकतो हे पाहायचे आहे.