
हैदराबाद कसोटीत जे यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुलचे झाले, तीच स्थिती रवींद्र जडेजाची झाली. होय, यशस्वी आणि राहुलप्रमाणेच रवींद्र जडेजाही हैदराबाद कसोटीत शतक झळकावण्यास मुकला. खेळाच्या तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात रवींद्र जडेजाला पाहून असे वाटत होते की, कसोटी कारकिर्दीतील चौथे शतक झळकावल्यावरच तो स्वस्थ बसेल, पण 120व्या षटकात जो रूटच्या चेंडूवर तो एलबीडब्ल्यू आऊट झाला. मात्र, जडेजाची विकेट वादाचे कारण ठरली.
Ravindra Jadeja Controversy : रवींद्र जडेजा आऊट आहे की नाही हे थर्ड अंपायरलाही नाही कळाले, पण तरीही त्याला पाठवण्यात आले पॅव्हेलियनमध्ये
रवींद्र जडेजाची विकेट का वादग्रस्त होती, हे तुम्हाला पुढे कळेल पण त्याला कसे बाद घोषित करण्यात आले, ते आधी समजून घ्या. रूटच्या चेंडूवर रवींद्र जडेजाने फ्रंट फूट डिफेन्स केला आणि यादरम्यान चेंडू त्याच्या पॅडला लागला. अंपायरने त्याला आऊट दिले. यानंतर रवींद्र जडेजाने लगेच रिव्ह्यू घेतला. रिप्लेमध्ये चेंडू त्याच्या बॅटला लागून पॅडवर आदळल्याचे दिसून आले. यामुळेच जडेजाने लगेच डीआरएसचा वापर केला. यानंतर थर्ड अंपायरने त्याच्याकडे उपलब्ध असलेले सर्व तंत्र वापरले.
The Root cause of English smiles 😃 on Day 3! 🔥
Keep watching LIVE action from the #INDvENG 1st Test on #JioCinema, #Sports18 & #ColorsCineplex. 👈#JioCinemaSports #BazBowled #IDFCFirstBankTestSeries pic.twitter.com/46eaaYHB64
— JioCinema (@JioCinema) January 27, 2024
चेंडू जडेजाच्या पॅडला लागला की बॅटला, हे तिसऱ्या पंचाला समजू शकले नाही. बराच वेळ रिप्ले सुरू राहिला आणि त्यानंतर जडेजाला आऊट देण्यात आले.
💔💔💔 unlucky 😔😔 just missed sword ⚔️ celebration 🎉😞 pic.twitter.com/ycSGmWmmHm
— Rajesh Biradar (@Rajesh_Biradar_) January 27, 2024
प्रश्न असा आहे की जडेजाच्या बॅटला किंवा पॅडला आधी चेंडू लागला की नाही हे तिसऱ्या अंपायरला माहीत नव्हते, मग त्याला आऊट कसे दिले गेले? आम्ही तुम्हाला सांगतो की अशा परिस्थितीत अनेकदा तिसरे पंच मैदानावरील पंचाच्या बाजूने निर्णय देतात. मैदानावरील अंपायरने जडेजाला आऊट दिले होते आणि त्यामुळे तिसरे अंपायर गोंधळलेल्या अवस्थेत त्याच्यासोबत उभे होते.
