आई होती वेटर, हॉटेलमध्ये जेवण बनवायचे वडील, आता मुलाने हरवले जोकोविचला, जॅनिक सिनरची अप्रतिम कहाणी


ऑस्ट्रेलियन ओपन 2023 मध्ये मोठा अपसेट दिसून आला आहे. ऑस्ट्रेलियात खेळल्या जात असलेल्या वर्षातील पहिल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या सर्बियाचा नोव्हाक जोकोविच आणि यानिक सिनर यांच्यात खेळला गेला. या सामन्यात सिनरने 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन जोकोविचचा 6-1, 6-2, 6-7 (8-6), 6-3 असा पराभव केला. हा सामना 3 तास 23 मिनिटे चालला. याआधी जोकोविचने ऑस्ट्रेलियातील मेलबर्न पार्कमधील सर्व 10 फायनल आणि सेमीफायनल सामने जिंकले होते, पण यावेळी सिनर त्याच्या मार्गात आडवा आला. कालपर्यंत अज्ञात असलेला सिनर अवघ्या एका सामन्यानंतर जगातील सर्वात प्रसिद्ध टेनिसपटू बनला आहे. प्रश्न असा आहे की सिनर कोण आहे आणि तो कुठून आहे?

जॅनिक सिनरचा जन्म 16 ऑगस्ट 2001 रोजी सॅन कॅन्डिडो, इटली येथे झाला. सध्या तो मॉन्टे-कार्लो येथे राहतो. सॅन कॅन्डिडो हे ऑस्ट्रियाच्या सीमेजवळ, उत्तर इटलीमधील दक्षिण टायरॉलमधील एक शहर आहे. सिनर लहानपणापासून रॉजर फेडररपासून प्रेरित होऊन टेनिस शिकत होता आणि या 22 वर्षीय खेळाडूची ही पहिली ग्रँड स्लॅम फायनल असेल. सिनर सेक्स्टन शहरात मोठा झाला, जिथे त्याचे वडील आणि आई स्की लॉजमध्ये शेफ आणि वेट्रेस म्हणून काम करत होते. त्याला मार्क नावाचा भाऊ आहे. सिनरने वयाच्या तिसऱ्या वर्षी स्कीइंग आणि टेनिस खेळायला सुरुवात केली. त्याने यापूर्वी चार वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्याने 2020 मध्ये रोलँड-गॅरोस येथे अंतिम आठमध्ये प्रवेश केला, जिथे त्याने अलेक्झांडर झ्वेरेव्हचा पराभव केला.


सिनरने 2022 च्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला, परंतु तेथे स्टेफानोस त्सित्सिपासकडून पराभव पत्करावा लागला आणि त्यानंतर जून 2022 मध्ये तो विम्बल्डनमध्येही अंतिम आठमध्ये पोहोचला, जिथे तो नोव्हाक जोकोविचकडून दोन सेटमध्ये आघाडी घेतल्यानंतर पाच सेटमध्ये पराभूत झाला. 2022 यूएस ओपनमध्ये, त्याने पुन्हा उपांत्यपूर्व फेरी गाठली, यावेळी पाच सेटच्या सामन्यात कार्लोस अल्काराझकडून पराभव पत्करावा लागला. पण या खेळाडूने आता अंतिम फेरी गाठली आहे.

हे संपूर्ण वर्ष सिनरसाठी आश्चर्यकारक आहे. तो अप्रतिम फॉर्ममध्ये आहे आणि त्याने त्याच्या शेवटच्या 20 पैकी 19 सामने जिंकले आहेत. सिनरने ऑक्टोबरमध्ये एटीपीचे जेतेपद पटकावले होते. इटलीच्या डेव्हिस चषक विजयातही त्याचा वाटा होता. आता त्याने 24 वेळा ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या नोव्हाक जोकोविचचा पराभव केला आहे. स्पेनचा राफेल नदाल दुसऱ्या स्थानावर असून त्याच्या नावावर 22 जेतेपदे आहेत.