Video : विना बॅट घेता धाव घ्यायला निघला मोहम्मद रिजवान, धडपडत पोहचला क्रीझवर, मग त्याने काय केले ते पाहून तुम्ही डोके धरला


पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. न्यूझीलंडने पहिले दोन सामने जिंकून मालिका आधीच जिंकली होती. तिसरा सामना आपण जिकू अशी आशा पाकिस्तानला होती, मात्र या सामन्यातही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तिसऱ्या T20 मध्ये न्यूझीलंडने पाकिस्तानचा 45 धावांनी पराभव केला. नवा कर्णधार शाहीन शाह आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानला चांगली सुरुवात करता आली नाही. या सामन्यात पाकिस्तानची अवस्था वाईट होती, मात्र सामन्यादरम्यान पाकिस्तानचा उपकर्णधार मोहम्मद रिझवानने असे काही केले की त्यावर प्रेक्षकांचा विश्वास बसणार नाही. या मॅचमध्ये रिझवान बॅटशिवाय धाव घेण्यासाठी निघाला आणि पुढे त्याने काय केले ते कोणालाही हसायला लावेल.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने सात गडी गमावून 224 धावा केल्या. या धावसंख्येसमोर पाकिस्तानचा संघ टिकू शकला नाही. 20 षटके खेळल्यानंतर पाकिस्तान संघाला 7 विकेट गमावून केवळ 179 धावा करता आल्या.


पाकिस्तान संघ फलंदाजी करत होता. डावातील सहावे षटक टाकले जात होते. मॅट हेन्री गोलंदाजी करत होता. हेन्रीने षटकातील पाचवा चेंडू रिजवानच्या पायावर टाकला, तो थोडा लहान होता. रिझवान हा चेंडू मिडविकेटच्या दिशेने खेळला आणि धाव घेण्यासाठी धावला, पण धाव घेण्यासाठी धावतच त्याचा तोल बिघडला आणि तो पडला. यादरम्यान त्याच्या हातातून बॅट निसटली. रिझवानने पुन्हा बॅट उचलली नाही आणि बॅट न घेताच धावायला लागला. रिझवान जेव्हा नॉन स्ट्रायकरच्या टोकाला पोहोचला, तेव्हा त्याने क्रीजमध्ये हात ठेवून धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, परंतु घाईघाईत त्याला क्रिझच्या आत हातही ठेवता आला नाही आणि तो वळला आणि दुसऱ्या धावेसाठी धावला. या कारणास्तव ही धाव एक लहान धाव झाली. या सामन्यात रिझवानने केवळ 24 धावा केल्या.

या सामन्यात न्यूझीलंडकडून सलामीवीर फिन ऍलनने शानदार फलंदाजी केली. त्याने झंझावाती शतक झळकावले. त्याने 62 चेंडूत 5 चौकार आणि 16 षटकारांसह 137 धावा केल्या. एवढी झंझावाती खेळी पाकिस्तानकडून कोणालाही खेळता आली नाही. बाबर आझमने 58 धावा केल्या आणि तो संघाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. मोहम्मद नवाजने 15 चेंडूत 28 धावा केल्या.