VIDEO : एमएस धोनीने अशा चर्चांना दिला पूर्णविराम, घरी परतताच सुरू केली IPL 2024 ची तयारी


एमएस धोनी आयपीएल 2024 मध्ये खेळणार किंवा न खेळण्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होते. अनेक गोष्टी होत्या. पण, आता त्याने या सर्व गोष्टींना पूर्णविराम दिला आहे. ऋषभ पंतच्या बहिणीच्या एंगेजमेंट पार्टीतून रांची येथील त्याच्या घरी परतल्यानंतर धोनीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. धोनीचा व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ तो आयपीएल 2024 मध्ये खेळू शकतो याचा पुरावा आहे आणि, तो केवळ खेळू शकत नाही, तर पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपदही भुषवू शकतो.


धोनीच्या ताज्या व्हिडीओमध्ये काय खास आहे हे सांगण्याआधी, त्याच्याबद्दल कोणते प्रश्न उपस्थित केले जात होते आणि ते का उपस्थित केले जात होते, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. धोनीबद्दल जे प्रश्न उपस्थित केले गेले, ते प्रामुख्याने त्याच्या कर्णधारपदाबद्दल आणि आयपीएल 2024 मध्ये खेळण्याबद्दल होते. धोनीला दुखापत झाल्यामुळे अशा गोष्टी घडल्या. दुसरे म्हणजे त्याचे वयही झाले आहे. बरं, वय हा फार मोठा मुद्दा नव्हता, कारण आजही त्याच्या फिटनेसचं उत्तर नाही. पण, गुडघ्याची दुखापत हे एक प्रमुख कारण होते. कारण तो उत्तराखंडमधील त्याच्या गावी गेला, तेव्हा व्हिडिओमध्ये तो लंगडत असल्याचे दिसत होता.


तथापि, धोनीच्या समोर आलेल्या नवीन व्हिडिओवरून आता हे स्पष्ट दिसते आहे की परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी त्यांना कसे वळवायचे हे त्याला माहित आहे. व्हिडिओमध्ये धोनी फलंदाजीचा सराव करत आहे. यावेळी त्याने आपल्या सुरक्षेचीही पूर्ण काळजी घेतली. तो पॅड आणि हेल्मेट घालून फलंदाजीला आला.

याच्या एक दिवस आधी धोनीच्या रांचीत आल्यावर त्याच्या स्वागताचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. रांचीचे चाहते धोनीची एक झलक पाहण्यासाठी आतुर झाले होते. आणि आता लगेचच त्याच्या फलंदाजीच्या सरावाचा व्हिडिओ समोर आला आहे. धोनीला आता केवळ स्वतःची झलकच नाही तर त्याच्या फलंदाजीची ताकदही चाहत्यांना दाखवायची आहे हे स्पष्ट झाले आहे. आणि, हे IPL 2024 मध्ये होण्याची शक्यता आहे.