शाकिब अल हसन निवडणूक जिंकताच झाला बदनाम, एका व्हिडिओमुळे झाली नाचक्की


बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसन याने निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याने निवडणूक जिंकली देखील आहे. साकिबने अवामी लीगच्या तिकिटावर बांगलादेशची सार्वत्रिक निवडणूक मगूर-1 मधून लढवली होती. त्यानी ही निवडणूक जिंकली आहे. पण यासोबतच त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शाकिब निवडणुकीच्या रंगात दिसत आहे, मात्र तो संतापतो आणि त्याच्या एका चाहत्याला थप्पड मारतो. यानंतर शाकिबवर जोरदार टीका होत आहे.

या निवडणुकीत साकिबने त्याचा जवळचा प्रतिस्पर्धी काझी रेझुल यांचा पराभव केला. या निवडणुकीत शाकिबला 185,388 मते मिळाली, तर त्याचा विरोधक काझी याला 45,993 मते मिळाली. क्रिकेटर असण्यासोबतच शाकिबला आता खासदारही म्हटले जाणार आहे.


शाकिब खासदार झाल्याची बातमी येताच, त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ निवडणुकीच्या दिवसातील असल्याचे सांगण्यात येत आहे. शाकिबने पांढरा कुर्ता-पायजमा आणि काळी हाफ सदरी परिधान केली आहे. तो एका ठिकाणी जात असताना एका चाहत्याने त्याला मागून पकडले आणि त्याने मागे वळून त्याला चापट मारतो. माझापेपर या व्हिडिओची पुष्टी करत नाही. हा व्हिडिओ कधीचा आहे, हे स्पष्ट झालेले नाही, मात्र मतदानादरम्यान बूथवर जात असताना शाकिबने त्याच्या एका चाहत्याला थप्पड मारल्याचे बोलले जात आहे. बांगलादेशात रविवारीच मतदान झाले आणि त्याच दिवशी मतमोजणी होऊन शाकिब खासदार झाला.

शाकिबला खूप रागीट मानले जातो. त्याने अनेकवेळा मैदानावर आपला राग दाखवला आहे. बांगलादेशात देशांतर्गत क्रिकेट खेळत असताना, एका सामन्यात जेव्हा अंपायरने फलंदाजाला त्याच्या आवाहनावर आऊट दिले नाही, तेव्हा त्याने स्टंपला लाथ मारून ते उखडले. दुसऱ्या एका सामन्यात तो उघडपणे अंपायरशी भांडताना दिसला. ढाका प्रीमियर लीगमध्ये अंपायरसोबत झालेल्या वादामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्डाने शाकिबलाही निलंबित केले होते.