Box Office : शाहरुखच्या डंकीने छापल्या तीनपट नोटा, 14व्या दिवशी किती केली कमाई


सुपरस्टार शाहरुख खान त्याच्या प्रत्येक चित्रपटामुळे नेहमीच चर्चेत असतो. चाहते शाहरुखच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात. किंग खान त्याच्या चाहत्यांना फार काळ थांबवत नाही. पण 2023 मध्ये त्याने 4 वर्षांनंतर बॉक्स ऑफिसवर कमबॅक केले. शाहरुख खानच्या कमबॅकने बॉक्स ऑफिसला हादरवले. त्याच वेळी, 2023 च्या शेवटी प्रदर्शित झालेला त्याचा डंकी चित्रपट देखील स्थिर व्यवसाय करत आहे.

डंकीच्या आकडेवारीवर चाहते सतत लक्ष ठेवून असतात. 120 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या डंकीने त्याच्या खर्चापेक्षा जास्त रक्कम जमा करून निर्मात्यांना खूश केले आहे. या चित्रपटाने बजेटपेक्षा तिपटीने जास्त व्यवसाय केल्याचे मानले जात आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच डंकीला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटगृहांमध्ये आपली पकड कायम राखत आहे.

सकनिल्‍कच्‍या ताज्या अहवालानुसार, शाहरुख खानच्‍या डंकी चित्रपटाने 14 व्‍या दिवशी सर्व भाषांत 3.30 कोटींचा बिझनेस केला आहे. त्यानंतर आता चित्रपटाचे एकूण कलेक्शन 203.92 कोटी रुपये झाले आहे. या चित्रपटाने जगभरात 400 कोटींचा आकडा पार केला आहे. जे बजेटपेक्षा तिप्पट आहे. डंकीला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे शाहरुख खान आणि दिग्दर्शक राजकुमार हिरानी खूपच खूश आहेत.

लंडनहून परतल्यानंतर शाहरुख खान त्याच्या पुढील चित्रपटांची घोषणा करणार असल्याचे मानले जात होते. आता किंग खान भारतात परतला आहे. चाहते आता त्याच्या घोषणेची वाट पाहत आहेत. 2024 मध्ये तो कोणता धमाका करतो, हे प्रत्येकाला पाहायचे आहे. शाहरुख आता त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल खूप निवडक झाला आहे.