द्वारकेत दिसला 5000 वर्ष जुना देखावा, 37000 महिलांनी केला महारासचा विश्वविक्रम!


द्वारकेत रविवारी सुमारे 5 हजार वर्षांपूर्वी श्रीकृष्णाच्या काळात झालेल्या अलौकिक विधींची पुनरावृत्ती झाली. येथे ब्रह्म मुहूर्तावर 37 हजार महिलांनी एकत्रितपणे महारास केली. ड्रोनमधून घेतलेल्या या भव्य परंपरेचा एक अप्रतिम व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये महारासचे अलौकिक दृश्य दिसत आहे. मोठी गोष्ट म्हणजे 37 हजार महिलांनी एकत्र रास गरबा खेळला आणि हा विश्वविक्रम ठरला. या कार्यक्रमाला भाजप महिला खासदारांनीही हजेरी लावली.

द्वारका येथे अखिल भारतीय महारास संघटनेच्या अंतर्गत अहिर समाजातील 37 हजारांहून अधिक महिलांनी महारास केली. भगवान श्री कृष्णाचे जन्मस्थान असलेल्या द्वारका येथे अहिर महिलांनी त्यांच्या जुन्या पारंपरिक पोशाखात महारास सादर करून इतिहास रचला.

यात्राधाम द्वारकेच्या पावन भूमीवर अहिर समाजात महारासचे आयोजन करण्यात आले होते, त्यात गेल्या 9 महिन्यांपासून समाजातील महिलांची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली होती. यामध्ये 37 हजारांहून अधिक महिलांनी नोंदणी करून रविवारी पहाटे महारास करून इतिहास रचला. यामध्ये महिलांनी आपला पारंपरिक वेश परिधान करून उत्साहाने सहभाग घेतला.


या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संपूर्ण गुजरातमधून महिला आल्या होत्या. कच्छच्या व्रजवानी गावात ढोलकी वाजायला लागल्यावर अहिर समाजातील 140 महिला आपले काम अपूर्ण सोडून रास खेळायला गेल्या होत्या, असे मानले जाते. लोककथेनुसार भगवान श्रीकृष्णाने हा ढोल वाजवला आणि सर्व महिला कृष्णासोबत रास करायला गेल्या. येथे ढोल वाजत राहिले आणि महिला रास खेळत राहिल्या. त्या ठिकाणी आजही सर्व महिलांच्या समाधी आहेत.

त्याच धर्तीवर महारासचे आयोजन करण्यात आले होते, त्यात अहिर समाजातील 37 हजारांहून अधिक महिलांनी भाग घेऊन इतिहास रचला. द्वारकेत होणाऱ्या महारासचा मुख्य उद्देश जागतिक स्तरावर शांतता राखणे आणि लोकांना स्वच्छतेचा संदेश देणे हा होता.