VIDEO : बाबर आझम आणि सर्फराज अहमदसोबत पर्थमध्ये झाला ‘अनर्थ’, हजारो चाहत्यांसमोर उघडे पडले पितळ


ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणाऱ्या पाकिस्तानी संघाची अवस्था पर्थमध्ये अत्यंत वाईट आहे. ऑस्ट्रेलियाच्या 487 धावांच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानी फलंदाज काही विशेष करू शकले नाहीत आणि इमाम उल हक वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला विकेटवर मोठी खेळी खेळता आली नाही. ना कॅप्टन शान मसूद चालला, ना सौद शकीलची बॅट चालली. माजी कर्णधार बाबर आझम आणि सर्फराज अहमद यांच्यासोबत पर्थमध्ये ‘अनर्थ’ घडला. हे दोन्ही फलंदाज इतक्या उत्कृष्ट चेंडूंवर बाद झाले की प्रेक्षक बघतच राहिले. यासोबतच ऑस्ट्रेलियाने या दोन फलंदाजांचे पितळही जगासमोर उघडे पाडले.


मिचेल मार्शने बाबर आझमची विकेट घेतली. या खेळाडूने शानदार कव्हर ड्राईव्हने सुरुवात केली, पण मिचेल मार्शने त्याच्या उत्कृष्ट लाईन आणि लेन्थ बॉलने त्याला पायचीत केले. बाबर आझमने 21 धावा केल्या.


मिचेल मार्शचा चेंडू चौथ्या स्टंपवर बाबर आझमने खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बॅटची कट घेऊन अॅलेक्स कॅरीच्या ग्लोव्हजमध्ये गेला.

सर्फराज अहमदची अवस्था आणखीनच बिकट होती. सर्फराज केवळ 6 चेंडूपर्यंत विकेटवर राहू शकला. त्याला मिचेल स्टार्कने उत्कृष्ट इनस्विंगरवर बोल्ड केले. मोठी गोष्ट म्हणजे हा चेंडू खेळण्यासाठी सर्फराज अहमदने पुढचा पायही काढला नाही. म्हणजे स्टार्कने सर्फराजच्या कमकुवत तंत्राचा फायदा घेतला. उत्कृष्ट फॉर्मात असलेल्या मोहम्मद रिझवानच्या जागी सर्फराज अहमदला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली. मात्र सर्फराज संघाच्या विश्वासावर उतरु शकला नाही.

इमाम उल हकनेही अर्धशतक झळकावले, पण त्याने अशी बालिश चूक करून विकेट गमावली ज्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. नॅथन लायनच्या चेंडूवर इमामने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान तो पुढे सरकला आणि चेंडू वळला. परिणामी इमाम यष्टीचीत झाला. पाकिस्तानी संघाला सेट झालेल्या फलंदाजाकडून अशा फटकेबाजीची अपेक्षा कधीच नसेल.