टीम बसमध्ये या खेळाडूला पाहून भडकला सूर्यकुमार यादव, बोट दाखवून घेतली शाळा, व्हिडिओ झाला व्हायरल


भारतीय संघाने नुकतीच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली. ही मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने शानदार शतक झळकावले. या मालिकेत सूर्यकुमार टीम इंडियाचा कर्णधार होता. आता टीम इंडिया एकदिवसीय मालिकेच्या तयारीत व्यस्त होणार आहे. रविवारपासून एकदिवसीय मालिका सुरू होत आहे. मात्र, या मालिकेपूर्वी सूर्यकुमारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सूर्यकुमार बसमधील आपल्या टीममेटवर चांगलाच भडकलेला दिसत आहे.

टी-20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे होऊ शकला नाही. दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला होता. तिसरा सामना भारताच्या नावावर होता. सूर्यकुमार दुसऱ्यांदा टीम इंडियाचे नेतृत्व करत होता. यापूर्वी त्याने भारतात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत संघाचे नेतृत्व केले होते. भारताने ही मालिका 4-1 ने जिंकली.


या व्हायरल व्हिडिओमध्ये सूर्यकुमार बसमध्ये चढतो आणि नंतर हसत हसत कोणाशी तरी बोलतो. थोडे पुढे सरकताच त्याची नजर अर्शदीपवर पडते. अर्शदीपला पाहून सूर्यकुमारचा मूड बदलतो आणि तो रागावलेला दिसतो. तो त्यांच्याकडे बोट दाखवतो आणि रागाने काहीतरी बोलतो. थोडा वेळ काहीतरी बोलून तो पुढे सरकतो. सुरुवातीला व्हिडिओ पाहिला तर सूर्यकुमार कोणावर रागावतो आहे, हे स्पष्ट होत नाही, पण व्हिडिओमध्ये सूर्यकुमार पुढे सरकत असताना त्याला अर्शदीप सिंगवर राग येत असल्याचे स्पष्ट होते. यानंतर सूर्यकुमार पुढे जातो आणि अर्शदीप सिंगच्या सीटच्या मागे बसतो.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या शेवटच्या टी-20 सामन्यात सूर्यकुमारने 100 धावांची खेळी केली होती. सूर्यकुमारचे टी-20 मधील हे चौथे शतक होते. यासह सूर्यकुमारने रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलची बरोबरी केली आहे. रोहित आणि मॅक्सवेल यांची टी-20मध्ये प्रत्येकी चार शतके आहेत. आता सूर्यकुमारनेही ती स्टेज गाठली असून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या रोहित आणि मॅक्सवेलच्या बरोबरीचा झाला आहे.