VIDEO : बाबर आझमची अप्रतिम गोलंदाजी, ऑस्ट्रेलियात पाकिस्तानी गोलंदाजांची अवस्था वाईट असताना शान मसूदने सोपवला चेंडू


असेच नाही बाबर आझमला हा पाकिस्तानी संघाचा सर्वात मजबूत दुवा असल्याचे म्हणतात. संघावर जेव्हा जेव्हा संकट येते, तेव्हा तो संघाची ढाल बनतो. असेच काहीसे ऑस्ट्रेलियात खेळल्या जात असलेल्या सराव सामन्यात पाहायला मिळाले. कॅनबेरा येथे पंतप्रधान इलेव्हन विरुद्ध खेळल्या जात असलेल्या सराव सामन्यात पाकिस्तानचे सर्व गोलंदाज थकलेले आणि दमलेले असताना कर्णधार शान मसूदने बाबर आझमकडे पाहिले. त्याने आपल्या संघातील सर्वात मोठ्या खेळाडूला चेंडू दिला आणि पुढे काय झाले, ते व्हिडिओमध्ये कैद झाले आहे.

सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने 9 बाद 391 धावा करून पहिला डाव घोषित केला. यानंतर ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधान इलेव्हन फलंदाजीसाठी आला, तेव्हा सलामीच्या जोडीमध्ये 96 धावांची भागीदारी झाली. पाकिस्तानला पहिल्या विकेटसाठी 36 व्या षटकाची वाट पाहावी लागली. यानंतर दुसऱ्या विकेटसाठी फारशी प्रतीक्षा करावी लागली नसली, तरी त्यानंतर पाकिस्तानच्या गोलंदाजांची वाईट अवस्था पाहायला मिळाली.


पाकिस्तानी गोलंदाज पुन्हा विकेटसाठी तळमळताना दिसले. जेव्हा सर्व गोलंदाज विकेटच्या शोधात थकलेले दिसत होते, तेव्हा नवा कर्णधार म्हणजेच शान मसूद बाबर आझमकडे पाहू लागला. कदाचित तो विकेट घेईल या आशेने त्याने चेंडू त्याच्याकडे दिला. बाबर आझमने एकही विकेट घेतली नाही, पण एक षटक टाकल्यावर फक्त एक धाव दिली.

सराव सामन्यात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान इलेव्हन संघाने 2 बाद 149 धावा केल्या. म्हणजे पहिल्या डावात पाकिस्तानपेक्षा ते अजूनही 242 धावांनी मागे आहेत. मॅट रेनशॉ 18 धावांवर नाबाद आहे, तर कॅमेरून ग्रीन 19 धावांवर नाबाद आहे. कॅमेरून बॅनक्रॉफ्ट 53 धावा करून बाद झाला, तर मार्कस हॅरिसने 49 धावा केल्या. आता तिसऱ्या दिवशी पाकिस्तानी गोलंदाज ताजेतवाने होतील, तेव्हा ते पंतप्रधान इलेव्हनच्या पहिल्या डावात उरलेल्या 8 विकेट लवकरात लवकर काढण्याचा प्रयत्न करतील, अशी अपेक्षा आहे.