VIDEO : या पाकिस्तानी फलंदाजाची दुर्दशा पाहण्यासारखी, ऑस्ट्रेलियाच्या ‘नवशिक्या’ गोलंदाजाने खूप छळ करून त्याला केले बाद


पाकिस्तान संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे, जिथे त्यांना 3 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. ती मालिका 14 डिसेंबरपासून सुरू होईल, परंतु त्याआधी, 6 डिसेंबरपासून पाकिस्तानचा सराव सामना सुरू झाला, जो तो ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान इलेव्हन संघासोबत खेळत आहे. सराव सामन्यात प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानी संघाच्या फलंदाजाची अवस्था ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने बिघडवली, जो अजूनही नवशिक्या आहे आणि त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा कोणताही अनुभव नाही. दुसरीकडे, पाकिस्तानी फलंदाजाला एक-दोन नव्हे, तर तब्बल 96 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आहे.

ऑस्ट्रेलियाच्या नवशिक्या गोलंदाजाचे नाव जॉर्डन बकिंघम आहे, तर ज्या पाकिस्तानी फलंदाजाला त्याने छळ करून बाद केले त्याचे नाव इमाम-उल-हक आहे. डावखुरा इमाम सलामीवीर म्हणून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला आहे. पण, सराव सामन्यात विरोधी गोलंदाजांचे धागेदोरे उलगडण्याआधीच त्याचाच खेळ संपला.

सराव सामन्याच्या पहिल्या डावात इमाम-उल-हकने 24 चेंडूंचा सामना करत 9 धावा केल्या. मात्र, 23 वर्षांचा जॉर्डन बकिंघम गोलंदाजीला येईपर्यंत या 9 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. जॉर्डनने पहिले षटक टाकताच इमामच्या डावाला ब्रेक लागला आणि पाकिस्तानलाही पहिला धक्का बसला.


जॉर्डनने पहिल्या ते पाचव्या चेंडूपर्यंत इमामला कसे गोंधळात टाकले, हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. आणि त्यानंतर सहाव्या म्हणजेच ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर त्याची विकेट घेण्यात यश मिळविले. जॉर्डनच्या या षटकातील प्रत्येक चेंडू इमाम-उल-हकला असा प्रश्न विचारत होता, ज्याचे त्याच्याकडे उत्तर नव्हते. परिणामी, शेवटी बाबर आझमच्या मित्राला मैदान सोडावे लागले.

गेल्या वर्षीच देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या जॉर्डनने सांगितले की, जर टॅलेंट असेल तर इमाम उल हकप्रमाणे स्टार आंतरराष्ट्रीय खेळाडूलाही गुडघे टेकावे लागतात. इमाम बाद झाला, तेव्हा पाकिस्तानच्या धावफलकावर केवळ 18 धावा होत्या. म्हणजे सलामीवीरांकडून जी सुरुवात हवी होती, ती मिळाली नाही.