‘श्वास रोखून बसा, आम्ही परत येत आहोत…’, कपिल शर्मासोबत पुन्हा दिसणार डॉक्टर गुलाटी, चाहत्यांना दिले मोठे सरप्राईज


प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्माने त्याच्या चाहत्यांसाठी एक मोठे सरप्राईज आणले आहे. 2017 पासून ज्या जोडीला पाहण्यासाठी चाहते वाट पाहत होते, ती पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. येथे आम्ही डॉक्टर गुलाटी म्हणजेच कपिल शर्मा शोच्या सुनील ग्रोव्हरबद्दल बोलत आहोत. कपिल शर्मासोबतच्या काही वादांमुळे त्याने शोमधून निरोप घेतला होता. पण, आता नेटफ्लिक्सने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर एकत्र दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये दोघांची जुनी जुगलबंदी स्पष्टपणे पाहायला मिळते.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये अर्चना पूरण सिंग, किकू शारदा, कृष्णा अभिषेक, राजीव ठाकूर आणि अनुकल्प गोस्वामी या दोघांसोबत मस्ती करताना दिसत आहेत, तेही प्रेक्षकांना भुरळ घालणार आहेत. स्पष्ट शब्दात सांगायचे, तर कपिल शर्माची जुनी टीम पुन्हा एकदा तुमच्यासाठी हजर होणार आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही तुमच्या आवडत्या शोच्या संपूर्ण टीमला हसताना पाहू शकता. तसेच, कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘श्वास रोखून बसा, ज्या क्षणाची तुम्ही वाट पाहत होते, तो क्षण आला, आम्ही फक्त नेटफ्लिक्सवर एकत्र येत आहोत’.


2017 मध्ये ऑस्ट्रेलियाहून मुंबईला परतत असताना कपिल शर्मा आणि डॉ. गुलाटी उर्फ ​​सुनील ग्रोव्हर यांच्यात वाद झाला होता. हे प्रकरण इतके वाढले होते की सुनीलने आजच्या X सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कपिलवर एक पोस्ट (ट्विट) केली होती. ज्यामध्ये त्याने अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. कपिल ‘तू देव नाहीस’ असे त्याने लिहिले होते. त्यानंतर सुनीलने कपिलचा शो सोडला आणि वेगळे झाले. पण आता व्हिडीओ पाहिल्यानंतर अंदाज लावला जाऊ शकतो की या दोघांनी आपले नाते सुधारले आहे.

अशा परिस्थितीत नेटफ्लिक्सने शेअर केलेला हा व्हिडिओ चाहत्यांसाठी एखाद्या भेटवस्तूपेक्षा कमी नाही. आता या दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. डॉ. गुलाटीने शो सोडल्यानंतर द कपिल शर्मा शोच्या लोकप्रियतेत खूप फरक पडला होता. त्यामुळे आता पुन्हा एकदा हसण्याचा डबल डोस मिळणार आहे, जेव्हा कपिल आणि डॉ गुलाटी तुम्हाला एकत्र हसवतील…