राहुल द्रविडच्या मुलाने केला चमत्कार, कर्णधार होताच खेळली अप्रतिम खेळी, वाचवले संघाला


पापा कहते बडा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा… राहुल द्रविडच्या मुलाने कयामत से कयामत तक या बॉलिवूड चित्रपटातील या गाण्याचे बोल बरोबर सिद्ध करुन दाखवले आहेत. होय, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा धाकटा मुलगा अन्वय याने असे काम केले आहे की, त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. अन्वय द्रविड सध्या विजय मर्चंट ट्रॉफीमध्ये कर्नाटकचा कर्णधार आहे आणि कर्णधार म्हणून त्याने अप्रतिम खेळी खेळली आहे.

अन्वयने उत्तराखंडविरुद्ध शानदार अर्धशतक झळकावले. या उजव्या हाताच्या फलंदाजाने 133 चेंडूत 59 धावांची खेळी केली आणि त्याच्या बॅटमधून 8 चौकार निघाले. आता तुम्ही विचार करत असाल की अन्वयने फक्त 59 धावा केल्या आहेत, यात कोणती मोठी गोष्ट आहे? अन्वयची ही खेळी खास आहे, कारण हा सामना ज्या एसीए स्टेडियमवर खेळला जात होता, ती खेळपटी फलंदाजीसाठी खूप अवघड होती आणि तरीही अन्वयने आपल्या संघासाठी सर्वोच्च धावसंख्या उभारली.


कर्नाटकचा कर्णधार अन्वय द्रविडने नाणेफेक जिंकून उत्तराखंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्नाटकच्या सलामीवीरांनीही अर्धशतकी भागीदारी केली, पण तल्हा शेरीफ बाद होताच, या संघाची मधली फळी विस्कळीत होऊ लागली. रेहान मोहम्मद 1 धावा करून बाद झाला आणि अनिकेत रेड्डीने 36 धावांवर आपली विकेट गमावली. यानंतर अन्वय द्रविडने क्रीझवर येऊन विकेटवर नांगर टाकला. अन्वयने सावध फलंदाजी करत 8 शानदार चौकार लगावले आणि त्याला अर्धशतक झळकावण्यात यश आले. अन्वयने कसे तरी आपल्या संघाला 220 धावांपर्यंत नेले, पण जेव्हा त्याची विकेट पडली, तेव्हा संघ 236 धावांवर गडगडला. पण असे असूनही अन्वयने ज्या पद्धतीने आपली टीम हाताळली, ते खरोखरच कौतुकास्पद आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की अन्वय द्रविड देखील विकेटकीपिंग करतो आणि त्याचे तंत्र देखील त्याच्या वडिलांसारखे आहे. येणाऱ्या काळात हा खेळाडू आपल्या वडिलांना नक्कीच प्रसिद्धी देणार आहे.