मिस युनिव्हर्सचा किताब जिंकणे ही काही सामान्य गोष्ट नाही. दरवर्षी लाखो सुंदरी हे स्वप्न पाहतात. पण एका व्यक्तीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. गेल्या अनेक दिवसांपासून मिस युनिव्हर्स 2023 ची चर्चा सुरू होती. यावर्षी जगभरातील 90 देशांतील सुंदर सौंदर्यवतींनी यात सहभाग घेतला होता. एल साल्वाडोरमध्ये या विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आता अखेर विजेत्याचे नाव समोर आले आहे.
मिस युनिव्हर्स 2023 चे नाव जाहीर, शेनिस पॅलासिओसने जिंकला मिस युनिव्हर्सचा मुकूट
MISS UNIVERSE 2023 IS @Sheynnispalacios_of !!!! 👑 🇳🇮@mouawad #72ndMISSUNIVERSE #MissUniverse2023 pic.twitter.com/cSHgnTKNL2
— Miss Universe (@MissUniverse) November 19, 2023
यावर्षी मिस युनिव्हर्स 2023 चा खिताब निकारागुआच्या शेनिस पॅलासिओसला मिळाला आहे. आज शनिसच्या आयुष्यातील एक मोठा दिवस आहे. तिने आपल्या सौंदर्याचा झेंडा जगभर फडकवला आहे.