VIDEO : पाकिस्तानी संघाबाबत मोठा खुलासा, रमीझ राजाने लीक केली बाबर आझमसोबतच्या मीटिंगची सर्व माहिती!


वर्ल्ड कप 2023 मध्ये कॉमेंट्री करणाऱ्या रमीझ राजाने पाकिस्तानच्या कर्णधाराची भेट घेतली. या बैठकीत अनेक बाबींवर चर्चा झाली. पण, त्यानंतर पाकिस्तानच्या एका खासगी टीव्ही चॅनलवर बसून रमीझ राजाने सर्व काही स्पष्टपणे उघड केले. त्यात त्याने सांगितले की, सध्या पाकिस्तानी संघात काय चालले आहे? पाकिस्तानी क्रिकेटपटू काय विचार करत आहेत आणि मुख्य म्हणजे कर्णधार बाबर आझम स्वत: त्याच्या कर्णधारपदाबद्दल काय विचार करत आहेत?

बाबर आझम याच्या भेटीत रमीझ राजाला जे कळले त्यावरून पाकिस्तान संघात निराशेचे वातावरण असल्याचे दिसून येते. खेळाडू दु:खी आणि आतून तुटलेले आहेत. रमीझ राजाच्या म्हणण्यानुसार, खेळाडूंवरील हा दडपशाही केवळ खराब कामगिरीमुळेच नाही, तर त्यांच्या देशातील लोकांचा पाठिंबा नसल्यामुळेही आहे. ते अस्वस्थ आहेत. रमीझच्या म्हणण्यानुसार, सोशल मीडियावर सुरू असलेल्या गोष्टींमुळे खेळाडूंचे मन दुखावले गेले आहे.

रमीझ राजाने मान्य केले की, खेळाडूंसोबत जे काही होत आहे, ते चुकीचे आहे. ठीक आहे, त्यांनी खूप चुका केल्या आहेत. त्यांची कामगिरी त्याच्या दर्जाप्रमाणे नव्हती. पण, याचा अर्थ असा नाही की आपण त्यांना काही बोलावे. बाबर आझम ज्या मानसिकतेत आहे, त्यातपण पत्रकार परिषदा घेतल्याबद्दल त्यांनी त्याचे कौतुकही केले. कदाचित तो त्याच्या जागी असता, तर आपल्याला हे काम करता आले नसते.

रमीझ राजाने शोमधील चर्चेदरम्यान एक वगळता जवळपास सर्व तथ्य उघड केले. बाबरच्या कर्णधारपदावर तो काहीही बोलला नाही. शोमध्ये त्याच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला की बाबर आझम पाकिस्तानात पोहोचताच कर्णधारपद सोडणार का? यासंदर्भात त्याच्याशी बोलले का? यावर रमीझ राजा म्हणाला की, बाबरने कर्णधारपदाच्या मुद्द्यावर त्याच्याशी चर्चा केली होती. पण तो सर्वांसमोर सांगू शकत नाही.