1 नोव्हेंबरपासून गॅस सिलिंडरपासून GSTपर्यंत काय होणार बदल? तुमच्या खिशावर होणार त्याचा थेट परिणाम


ऑक्टोबर महिना संपायला अवघे दोनच दिवस उरले आहेत. त्यानंतर नोव्हेंबर महिना सुरू होईल. प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला किंवा पहिल्या तारखेला देशात अनेक गोष्टी बदलतात. या बदलांचा थेट परिणाम सामान्य माणूस आणि त्यांच्या खिशावर होतो. 1 नोव्हेंबरपासून काही गोष्टींमध्ये बदल होणार आहेत, ज्याचा परिणाम तुमच्या खिशावर होईल. अशा स्थितीत आज आम्ही तुम्हाला 1 नोव्हेंबरपासून कोणते मोठे बदल होणार आहेत, हे सांगणार आहोत. नवीन महिन्याच्या सुरुवातीला जीएसटीपासून लॅपटॉप आयातीपर्यंत अनेक बदल समाविष्ट आहेत.

या गोष्टींमध्ये बदल होतील

गॅस सिलिंडरची किंमत
गॅस सिलिंडरच्या किमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी बदलतात. या दिवशी संपूर्ण महिन्यासाठी गॅस सिलिंडरच्या किमती निश्चित केल्या जातात. तेल कंपन्यांच्या मते, किंमती वाढू किंवा कमी होऊ शकतात. तसेच, असे होऊ शकते की किमतींमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही म्हणजेच सध्याचे दर कायम ठेवले जातील.

जीएसटीबाबत नियमात बदल
नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर (NIC) नुसार, 100 कोटी किंवा त्याहून अधिक उलाढाल असलेल्या व्यवसायांना 1 नोव्हेंबरपासून 30 दिवसांच्या आत ई-चलन पोर्टलवर GST चलन अपलोड करावे लागेल. जीएसटी प्राधिकरणाने सप्टेंबरमध्ये हा निर्णय घेतला होता.

आयात संबंधित अंतिम मुदत
सरकारने HSN 8741 श्रेणीतील लॅपटॉप, टॅब्लेट, वैयक्तिक संगणक आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या आयातीवर 30 ऑक्टोबरपर्यंत सूट दिली होती. मात्र, 1 नोव्हेंबरपासून काय होणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

व्यवहार शुल्क
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच बीएसईने 20 ऑक्टोबर रोजी जाहीर केले होते की ते 1 नोव्हेंबरपासून इक्विटी डेरिव्हेटिव्ह विभागावरील व्यवहार शुल्क वाढवतील. हे बदल S&P BSE सेन्सेक्स पर्यायांवर लागू होतील. व्यवहाराच्या वाढत्या खर्चाचा व्यापाऱ्यांवर, विशेषतः किरकोळ गुंतवणूकदारांवर नकारात्मक परिणाम होईल.