
कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात दिल्ली तुरुंगात असलेला गँगस्टर सुकेश चंद्रशेखर याने पुन्हा एकदा बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला पत्र लिहिले आहे. सुकेशने पत्रात लिहिले आहे की, जॅकलीन आणि तिच्या आजूबाजूला पसरलेली नकारात्मकता दूर करण्यासाठी यावेळी तो नवरात्रीमध्ये उपवास ठेवणार आहे. माता भवानी आपल्यावर आशीर्वादाचा वर्षाव करील असा त्यांचा विश्वास आहे.
सुकेश जॅकलिन फर्नांडिससाठी करणार नवरात्रीचा उपवास, पत्र लिहून सांगितली मन की बात
जॅकलिनच्या सौंदर्याचे कौतुक करताना सुकेशने लिहिले आहे की, दोहा इव्हेंटमध्ये ती (जॅकलिन) खूपच सुंदर दिसत होती. लवकरच दोघेही एकत्र दिसणार आहेत. सुकेशने लिहिले की, जगातील कोणतेही जेल मला तुझ्यापासून (जॅकलीन फर्नांडिस) हिरावून घेऊ शकत नाही. सुकेशच्या म्हणण्यानुसार तो पूर्ण 9 दिवस उपवास करणार आहे. देवी तुला आशीर्वाद देईल आणि लवकरच सर्व काही ठीक होईल.
सुकेशने पत्रात लिहिले आहे की, आनंद लवकरच परतणार आहे. सत्याची वेळ आली आहे. तो तिच्यावर (जॅकलिन) अपार प्रेम करतो. त्याच्यावर कितीही आरोप झाले तरी ते कधीच खरे सिद्ध होणार नाहीत. उलटी गिनती सुरू झाली आहे. सुकेश पुढे पत्रात लिहितो, काळजी करू नको. मी तुला मदत करण्यास सदैव तयार असेन. मला माहित आहे की तुझे (जॅकलिन) माझ्यावर किती प्रेम आहे? मी तुझ्यासाठी जगतो आहे. तू माझी जीवनरेखा आहेस.
मात्र, सुकेशने जॅकलिनला लिहिलेले हे पहिले पत्र नाही. याआधीही त्याने तब्बल चार वेळा पत्र लिहून जॅकलिनवरचे प्रेम व्यक्त केले होते. सुकेशने या वर्षी मार्चमध्येही आपल्या वाढदिवसाला असेच पत्र लिहिले होते. त्यानंतर एप्रिलमध्येही त्याचे एक पत्र माध्यमांसमोर आले. मे महिन्यात त्याने एका पत्राद्वारे त्यांच्या मनात काय चालले होते, ते सांगितले होते. सुकेशने नेहमीच जॅकलिनवर प्रेम असल्याचा दावा केला आहे. या काळात त्यांनी अनेक महागड्या भेटवस्तूही दिल्या. सुकेशचे जॅकलिनसोबतचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
