
Lexar JumpDrive F35 USB 3.0 पेन ड्राइव्ह भारतात लाँच करण्यात आला आहे. हा पेनड्राइव्ह 3000 एमबी/सेकंद वेगासोबत येतो. हा फिंगरप्रिंट सपोर्टेड पेनड्राइव्ह आहे. याचा अर्थ, जर तुम्ही पॅन ड्राइव्ह कुठेतरी विसरलात किंवा पॅन ड्राइव्ह चोरीला गेला असेल, तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही, कारण तो हरवला किंवा चोरीला गेला तरी, कोणीही तुमचा डेटा ऍक्सेस करू शकणार नाही. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
पेनड्राइव्ह चोरीची समस्या संपली, भारतात लाँच झाला फिंगरप्रिंट सिक्युरिटी जंपड्राईव्ह F35 USB
Lexar JumpDrive F35 दोन प्रकारांमध्ये येतो. त्याचा 32 GB स्टोरेज आणि 150MB/s स्पीड असलेला पेनड्राइव्ह 4500 रुपयांना मिळतो, तर 64 GB 300MB/s स्पीड असलेला पेनड्राइव्ह 6000 रुपयांना मिळतो. हा सर्व प्रमुख ऑनलाइन आणि ऑफलाइन रिटेल स्टोअरमधून खरेदी केले जाऊ शकतो.
Lexar JumpDrive F35 ची वैशिष्ट्ये
- यूएसबी 3.0 सपोर्ट
- डेटा ट्रान्सफर स्पीड 300 MB/सेकंद
- सुमारे 10 फिंगरप्रिंट आयडी प्रवेश
- अल्ट्रा-फास्ट कनेक्टिव्हिटी
- सोपे सेटअप
- 256-बिट AES एन्क्रिप्शन
- तीन वर्षांची मर्यादित वॉरंटी
Lexar चे F35 JumpDrive हे स्टोरेज डिव्हाइस आहे. हा पेन ड्राईव्ह अशा लोकांसाठी तयार करण्यात आला आहे, जे त्यांच्या डेटाच्या सुरक्षिततेबद्दल खूप चिंतित आहेत. हे टाळण्यासाठी फिंगरप्रिंट सुरक्षा वापरली जाऊ शकते. या ड्राइव्हमध्ये, एका वेळी 10 लोकांच्या बोटांचे ठसे संग्रहित केले जाऊ शकतात. याचा अर्थ असा की, तुम्हाला हवे असल्यास तुमच्यासह इतर अनेक लोकांच्या बोटांचे ठसे या ड्राइव्हला जोडता येतील. फिंगरप्रिंटमुळे, पॅन ड्राइव्हमध्ये प्रवेश करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज नाही. अल्ट्रा फास्ट ओळख तुम्हाला तुमच्या ड्राइव्हमध्ये 1 सेकंदापेक्षा कमी वेळेत प्रवेश करण्यात मदत करते. तुम्ही पासवर्ड सेट करण्यासाठी आणि तुमच्या फिंगरप्रिंटसह प्रमाणित करण्यासाठी पूर्व-स्थापित अनुप्रयोग वापरू शकता. हा पेन ड्राइव्ह 256-बिट एईएस एनक्रिप्टेड आहे.
