Tejas Teaser : भारत को छेड़ोगे तो छोड़ेंगे नहीं… कंगना राणावतच्या ‘तेजस’चा अप्रतिम टीझर रिलीज


बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत गेल्या काही दिवसांपासून तिच्या आगामी ‘तेजस’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. आता 2 ऑक्टोबरला निर्मात्यांनी या चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. खुद्द कंगनाने हा टीझर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये ती एअरफोर्स पायलटच्या भूमिकेत दिसत आहे. तिचे पात्र खूपच मजबूत दिसते.

कंगनाच्या आगामी चित्रपटाचा टीझर केवळ दमदार दिसत नाही तर त्यात प्रभावी संवादही आहेत. ती म्हणते, “भारत को छेड़ोगे तो छोड़ेंगे नहीं…” टीझर रिलीजसोबतच अभिनेत्रीने ट्रेलर रिलीज डेटही जाहीर केली आहे. 8 ऑक्टोबरला वायुसेना दिनानिमित्त या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.


टीझर सुरू होतो आणि कंगनाचा एक दमदार डायलॉग ऐकू येतो. ती म्हणते, “जरूरी नहीं कि हर बात होनी चाहिए…जंग के मैदान में अब जंग होनी चाहिए…कि हो गया मेरे वतन पर बहुत ही सितम, अब तो आकाश से बारिश नहीं आग बरसनी चाहिए.” या संवादानंतर कंगना दमदार स्टाईलमध्ये एन्ट्री करते. टीझर शेअर करताना कंगनाने लिहिले की, देशाच्या प्रेमासाठी मी उड्डाण करण्यास तयार आहे.

तेजसच्या टीझर आणि ट्रेलरच्या तारखेसोबत कंगनाने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही उघड केली आहे. हा चित्रपट 27 ऑक्टोबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सर्वेश मेवाडा यांनी केले असून रॉनी स्क्रूवाला त्याचे निर्माते आहेत.

कंगना सध्या चंद्रमुखी 3 साठी चर्चेत आहे. हा चित्रपट 28 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करत आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, चित्रपटाने रिलीजच्या चार दिवसांत 23.90 कोटींची कमाई केली आहे. तेजस व्यतिरिक्त कंगनाचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपटही याच वर्षी प्रदर्शित होणार आहे.