सिराजने श्रीलंकेपासून 16 हजार किमी लांब असे काय केले? ज्यामुळे त्याला आशिया चषक फायनलमध्ये झाला फायदा


मोहम्मद सिराज… हे नाव सध्या जागतिक क्रिकेटमध्ये चर्चेत आहे. का नाही, शेवटी त्याने कामच असे केले आहे. आशिया कपच्या अंतिम सामन्यात सिराजने आपल्या स्विंग गोलंदाजीने श्रीलंकेला शरणागती पत्करण्यास भाग पाडले. श्रीलंकेचा संघ अवघ्या 50 धावांत गडगडला आणि सिराजने 21 धावांत 6 बळी घेतले. मोठी गोष्ट म्हणजे सिराजने त्याच्या दुसऱ्याच षटकातच 4 बळी घेतले. आता प्रश्न असा आहे की सिराजने हे कसे केले? सिराजने कुलदीप यादवसोबतच्या संवादात त्याचे रहस्य सांगितले आहे.

मोहम्मद सिराजने कुलदीप यादवसोबतच्या संभाषणात सांगितले की, त्याची आवडती विकेट दसून शनाकाची होती, ज्याला त्याने गोलंदाजी केली. सिराजने हा चेंडू क्रीजच्या कोपऱ्यातून टाकला होता आणि शनाकाने लेग साइडने खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेवटच्या क्षणी चेंडू स्विंग झाला आणि शनाकाचे स्टंप उडून गेले. सिराजने सांगितले की, ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट विकेट आहे आणि तो श्रीलंकेपासून 16 हजार किमी लांब दूर असलेल्या वेस्ट इंडिजमध्ये या प्रकारच्या चेंडूचा सराव करत होता.


सिराजने सांगितले की, तो वेस्ट इंडिजमध्ये असा चेंडू टाकण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामध्ये तो फलंदाजाला दाखवेल की चेंडू त्याच्या दिशेने येत आहे, परंतु शेवटच्या क्षणी तो बाहेर येईल आणि त्याच्या विकेट्सवर आदळतो. श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने प्रयत्न केला आणि परिणामी दसुन शनाका बोल्ड झाला. सिराजचा हा चेंडूही खास होता, कारण त्याच्या जोरावर त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच पाच बळी घेण्याची कामगिरी केली.

सिराजने सांगितले की, श्रीलंकेविरुद्ध पहिली पाच विकेट घेणे त्याच्यासाठी खास आहे. गेल्या वर्षी श्रीलंकेविरुद्ध पाच बळी घेण्याच्या जवळ पोहोचल्याचे सिराजने सांगितले. त्रिवेंद्रम वनडेत त्याने चार षटकांत चार विकेट घेतल्या. पण पुढच्या 6 षटकांत त्याला एकही बळी घेता आला नाही.


बरं, सिराज म्हणाला की ती नशिबाची गोष्ट होती आणि आशिया कप फायनलमध्ये नशीब त्याच्यासोबत होते. आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत अशी कामगिरी होणे खूप खास असल्याचे सिराजने सांगितले. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेतही तो असाच काहीसा प्रयत्न करेल, अशी आशा सिराजला आहे. साहजिकच या कामगिरीनंतर त्याचा आत्मविश्वास उंचावला आहे.