8 दिवसात बदलली टीम इंडिया, रोहित शर्माच्या खरडपट्टीचा दिसून आला परिणाम


आशिया कप-2023 मध्ये भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. 2 सप्टेंबरला भारताचा सामना पाकिस्तानशी होणार होता, मात्र तो पावसामुळे सामना वाहून गेला. या सामन्यात भारतीय संघाच्या फलंदाजांनी निराशा केली. यानंतर भारताचा सामना नेपाळशी झाला, जिथे संघ विजयी झाला. भारताने हा सामना 10 विकेटने जिंकला होता. पण या सामन्यात भारताचे क्षेत्ररक्षण खूपच खराब होते आणि सामन्यानंतर संघाचा कर्णधार रोहित शर्मानेही याबाबत चिंता व्यक्त केली होती. हा सामना 4 सप्टेंबरला खेळला गेला होता, पण या सामन्यात रोहित जे काही बोलला, त्याचा परिणाम संघावर झाला आणि संघ बदलला. मंगळवारी झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात हे दिसून आले.

भारताने मंगळवारी श्रीलंकेचा 41 धावांनी पराभव केला. यासह त्याने आशिया कप-2023 च्या अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले आहे. या सामन्यात भारताने मोठी धावसंख्या उभारली नाही. टीम इंडिया 49.1 ओव्हरमध्ये 213 रन्सवर ऑलआऊट झाली. मात्र, भारतीय गोलंदाजांनी हे लक्ष्य वाचवले आणि श्रीलंकेचा डाव 41.3 षटकांत 147 धावांत गुंडाळला.


भारताने नेपाळविरुद्ध तीन झेल सोडले होते. विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना झेल घेता आले नाहीत. ग्राउंड फिल्डिंग देखील काही विशेष नव्हते. पण श्रीलंकेविरुद्ध भारताने शानदार क्षेत्ररक्षण करत उत्कृष्ट झेल घेतले. या सामन्यात रोहित, सूर्यकुमार यादव आणि केएल राहुल यांनी शानदार झेल घेतले. या सामन्यात राहुलने पथुम निसांकाचा उत्कृष्ट झेल घेतला. तिसरे षटक टाकण्यासाठी आलेल्या जसप्रीत बुमराहच्या पहिल्याच चेंडूने निसांकाच्या बॅटची कड घेतली आणि यष्टिरक्षक राहुलने त्याच्या उजव्या बाजूने डायव्हिंग करत निसांकाला पॅव्हेलियनमध्ये पाठवत अप्रतिम झेल घेतला. निसांकाने सहा धावा केल्या.


श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाला पॅव्हेलियनमध्ये पाठवण्यात कर्णधार रोहितचा मोठा वाटा होता. 26 वे षटक टाकण्यासाठी आलेल्या रवींद्र जडेजाचा चेंडू शनाकाच्या बॅटची कड घेत स्लिपजवळ जात होता, पण रोहितने उजवीकडे डायव्हिंग करून तो पकडला. शनाकाला केवळ नऊ धावा करता आल्या. या सामन्यात पर्याय म्हणून सूर्यकुमार यादव मैदानात उतरला होता. या सामन्यात त्याने दोन झेल घेतले. त्याने कुसल मेंडिस आणि महिष तीक्ष्णाचा झेल घेतला, पण त्याने घेतलेला तीक्ष्णाचा झेल उत्कृष्ट होता. तीक्ष्णाने हार्दिक पांड्याचा चेंडू मिड-ऑनच्या जवळ चार धावांवर पाठवण्याचा प्रयत्न केला, पण सूर्यकुमारने बाजूकडे डायव्हिंग करताना उत्कृष्ट झेल घेतला. याशिवाय भारताचे एकूण क्षेत्ररक्षणही चांगले दिसले.