थंड अन्न आरोग्यासाठी ठरू शकते घातक, जाणून घ्या का फायदेशीर आहे गरम जेवण


व्यस्त जीवनामुळे बहुतेक लोक त्यांच्या आहाराबाबत बेफिकीर दिसतात. ऑफिस किंवा शाळेला उशीर होऊ नाही, यासाठी बहुतेक लोक रेडी टू इटसारख्या गोष्टींवर अवलंबून असतात. पण अशा गोष्टींमुळे आरोग्याचे अनेक नुकसान होऊ शकते. शरीराच्या विकासासाठी सकस आणि पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे.

यासोबतच आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की नेहमी गरम अन्न खावे. घरातील गरमागरम पदार्थ खाणे सहसा सर्वांनाच आवडते. पण ऑफिस, शाळा किंवा इतर कामामुळे जेवण थंड पडते. असे काही लोक आहेत, जे अन्न गरम न करता खातात. आरोग्य तज्ञांच्या मते, गरम अन्न आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

गरम अन्न खाल्ल्याने पोट खराब होण्याचा धोकाही कमी होतो, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जेव्हा गरम अन्न आपल्या शरीरात पोहोचते, तेव्हा ते सहजपणे शोषले जाते. ते पचवण्यासाठी शरीराला फार कष्ट करावे लागत नाहीत. जर कोणी सतत थंड अन्न खात असेल, तर त्यामुळे पोटदुखी किंवा पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात.

थंड अन्नामध्ये बॅक्टेरिया असू शकतात. पण थंड अन्नापेक्षा गरम अन्न जास्त पौष्टिक असते. गरम अन्नामध्ये जीवाणू जन्म घेऊ शकत नाहीत. याशिवाय अन्न नीट शिजवून खाल्ले, तर संसर्ग होऊन खराब होण्याचा धोका कमी होतो.

गरम अन्न खाल्ल्याने मेटाबॉलिझमला चालना मिळते. तथापि, हे नेहमीच घडले पाहिजे, असे नाही. जर तुम्ही गरम अन्न खाल्ले, तर ते अधिक स्वादिष्ट लागते, ज्यामुळे तुमची भूक आपोआप वाढते. त्याचा थेट परिणाम तुमच्या चयापचयावरही होतो.

त्यामुळे गरम अन्न खाण्याचे इतके फायदे झाल्यानंतर आता तुम्हीही थंड अन्न खाणे बंद केले पाहिजे. थंड अन्न आरोग्यासाठी चांगले नसल्यामुळे आहारात गरम आणि ताज्या अन्नाला प्राधान्य द्या.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही