Shocking : विंचवाचीही केली जाते ‘शेती’, विश्वास बसत नसेल तर हा व्हिडीओ पाहा


पृथ्वीवर असलेला प्रत्येक प्राणी कोणत्या ना कोणत्या कारणाने खास आहे. देवाने त्यांना असेच निर्माण केले नाही. प्रत्येकजण निसर्गाशी जोडलेला आहे. म्हणूनच असे म्हटले जाते की जर पृथ्वीवरून सर्व सजीव नष्ट झाले, तर मानवाचे अस्तित्वही संपुष्टात येईल. पृथ्वीवरील साप आणि विंचू यांसारख्या धोकादायक प्राण्यांचा काय उपयोग होतो, असा प्रश्न तुम्हाला पडत असेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की त्यांचा मानवालाही खूप उपयोग होतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की विंचूचे विष बाजारात चढ्या भावाने विकले जाते. त्यामुळेच अनेक ठिकाणी त्यांचे संगोपनही केले जाते. आजकाल याशी संबंधित एक खळबळजनक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वास्तविक, या व्हिडिओमध्ये विंचूंचा मोठा साठा दिसत आहे. एकाच ठिकाणी इतके विंचू दिसले की कोणाचीही अवस्था बिकट होईल. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका मोठ्या हॉलमध्ये असंख्य विंचू उपस्थित आहेत. त्यांचे पालनपोषण केले जात आहे. त्यांना वेळोवेळी जेवण दिले जात आहे. सध्या हे विंचू लहान असले, तरी ते थोडे मोठे झाल्यावर त्यांना प्रयोगशाळेत नेऊन त्यांच्या शरीरातील विष काढले जाईल. एक लिटर विंचवाच्या विषाची किंमत आठ कोटींहून अधिक असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, विंचवाच्या शरीरातून विषाचे दोन थेंबच बाहेर पडू शकतात.

पहा धक्कादायक व्हिडिओ

विंचूंच्या ‘शेती’चा शहारे आणणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @fasc1nate नावाच्या आयडीसह तो शेअर करण्यात आला आहे. सुमारे एक मिनिटाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 9 दशलक्ष किंवा 90 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर हजारो लोकांनी या व्हिडिओला लाइकही केले आहे.

त्याचबरोबर विंचूसोबतचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्सनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहीजण म्हणत आहेत की हे अतिशय भयानक दृश्य आहे, तर काहीजण आश्चर्यचकित होऊन विचारत आहेत की त्यांच्या जेवणाची ताट उचलण्याची हिंमत कोणात असेल?