‘शिवशक्ती’ पॉईंटवर चंद्राचे रहस्य उघडण्यात गुंतला प्रज्ञान रोव्हर, इस्रोने जारी केला नवीन व्हिडिओ


चांद्रयान-3 मोहिमेअंतर्गत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाठवण्यात आलेले प्रज्ञान रोव्हर ‘शिवशक्ती’ बिंदूवर चालताना दिसला आहे. भारताची अंतराळ संस्था ‘इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन’ (ISRO) ने रोव्हरचा एक नवीन व्हिडिओ जारी केला आहे. शनिवारी प्रसिद्ध झालेल्या नवीन व्हिडिओमध्ये चांद्रयान-3 चा प्रज्ञान रोव्हर विक्रम लँडरमधून बाहेर पडताना दिसत आहे. लँडरमधून बाहेर आल्यानंतर तो चंद्राच्या पृष्ठभागावर खूप दूर जाताना दिसतो.

इस्रोने हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘दक्षिण ध्रुवावर चंद्राच्या रहस्यांच्या शोधात, प्रज्ञान रोव्हर शिवशक्ती पॉईंटभोवती फिरत आहे.’ इस्रोने जारी केलेला व्हिडिओ 40 सेकंदांचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी चांद्रयान-3 अंतराळयान ज्या ठिकाणी उतरले त्या जागेची घोषणा केली. ती जागा आता शिवशक्ती पॉइंट म्हणून ओळखली जाणार आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी बेंगळुरूमध्ये इस्रो टेलिमेट्री ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क (ISTRAC) येथे पोहोचले. येथे त्यांनी चांद्रयान-3 मोहिमेतील शास्त्रज्ञांची भेट घेतली. इस्रो टीमला संबोधित करताना त्यांनी चांद्रयान-3 अंतराळयानाच्या लँडिंग साइटच्या नावाची घोषणा केली. आपले चांद्रयान ज्या ठिकाणी उतरले त्या जागेला आता ‘शिवशक्ती पॉइंट’ म्हटले जाईल, असे ते म्हणाले.

ते म्हणाले, ‘चांद्रयान-3 चे लँडर ज्या ठिकाणी उतरले ते आता ‘शिवशक्ती’ म्हणून ओळखले जाईल. शिवामध्ये मानवतेच्या कल्याणाचा संकल्प आहे आणि शक्ती आपल्याला ते संकल्प पूर्ण करण्याची शक्ती देते. पीएम मोदी पुढे म्हणाले, चंद्राचा शिवशक्ती पॉइंट हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत कनेक्टिव्हिटीची अनुभूती देतो.