Made In Heaven 2 Trailer : रोगी समाजाचे वास्तव दाखवणार मेड इन हेवन 2


शोभिता धुलिपाला आणि अर्जुन मेहरा यांच्या मल्टीस्टारर वेब सिरीज मेड इन हेवनच्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर रिलीज झाला आहे. तीन मिनिटे 23 सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये अनेक कलाकार दाखवण्यात आले आहेत. वेडिंग प्लॅनरभोवती फिरणारी ही वेबसिरीज यावेळी आणखी मुद्दे मांडणार आहे. मालिकेच्या ट्रेलरमध्ये अनेक पैलूंची झलक दाखवण्यात आली आहे.

यावेळी या मालिकेत मृणाल ठाकूर आणि दिया मिर्झा या कलाकारही छोट्या पण महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. ट्रेलरमध्येही ही पात्रे प्रकर्षाने दाखवण्यात आली आहेत. मेड इन हेवनचा पहिला भाग खूप आवडला आणि त्याचे चाहते खूप दिवसांपासून सीझन 2 ची वाट पाहत आहेत.


मेड इन हेवन 2 OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर रिलीज होणार आहे. तो मोठ्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे, हे त्याच्या ट्रेलरवरून स्पष्ट होत आहे. या मालिकेचे दिग्दर्शन चार नामवंत दिग्दर्शकांनी केले आहे. त्यात झोया अख्तर, अलंकृता श्रीवास्तव, नीरज घायवान आणि नित्या मेहरा यांचा समावेश आहे. यात समलैंगिकता, वर्णभेद, विवाहित संबंध, आई-मुलाचे नाते, घरगुती हिंसाचार असे अनेक मुद्दे या ट्रेलरमध्ये मांडण्यात आले आहेत. मुख्य पात्रांच्या अवतीभवती असलेल्या या पात्रांच्या जीवनातून समाजातील सत्य दाखवण्याचा प्रयत्न फळाला येईल का, हे मालिका पाहिल्यानंतरच कळेल.

या मालिकेत यावेळी निर्मात्यांनी बरेच कलाकार ठेवले आहेत. अर्जुन मेहरा, शोभिता धुलिपाला, जिम सरभ, कल्की कोचलिन, शशांक अरोरा, शिवानी रघुवंशी, मोना सिंग त्रिनेत्रा हलदर, ईश्वर सिंग आणि विजय राज यांसारखे कलाकार यात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. याशिवाय अनेक स्टार्स वधू-वराच्या भूमिकेत आहेत.