The Hunt For veerappanTrailer : 119 लोकांची हत्या करणाऱ्या वीरप्पनवर आधारित सिरीजचा ट्रेलर रिलीज


ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स द हंट फॉर वीरप्पन नावाची नवीन माहितीपट सिरीज घेऊन येत आहे. ही मालिका दक्षिण भारतातील चंदन तस्कर वीरप्पनवर आधारित असणार आहे. नेटफ्लिक्सने गुरुवारी त्याचा ट्रेलर रिलीज केला आहे, ज्यामध्ये वीरप्पनच्या गुन्ह्यांची झलक पाहायला मिळत आहे.

ट्रेलरची सुरुवात व्हॉईस-ओव्हरने होते, ज्यामध्ये वीरप्पनच्या गुन्ह्यांचा उल्लेख केला जात आहे. इतिहासात वीरप्पनसारखा गुन्हेगार कधीच घडला नसल्याचे बोलले जात आहे. या ट्रेलरमध्ये वीरप्पनने 119 लोकांची हत्या केल्याचे सांगण्यात आले आहे. हा ट्रेलर शेअर करताना नेटफ्लिक्सने लिहिले की, एका तस्कराची माफिया बनण्याची कहाणी.


वीरप्पन हा दक्षिण भारतातील तस्कर होता. या गुन्ह्यांमुळे त्यांनी खळबळ उडवून दिली होती. शेकडो लोकांना ठार मारण्याबरोबरच त्याने 2000 हून अधिक हत्तींचीही शिकार केल्याचे सांगितले जाते. हत्तींची शिकार केल्यानंतर तो त्यांच्या दातांची तस्करी करत असे. तामिळनाडू स्पेशल टास्क फोर्सने वीरप्पनचा सामना केला.

या सिरीजबद्दल बोलायचे झाले, तर ही मालिका हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याची रिलीज डेट 4 ऑगस्ट आहे. ही पहिलीच वेळ नसली तरी याआधीही वीरप्पनची कथा पडद्यावर दाखवण्यात आली आहे. 2016 मध्ये वीरप्पनवर याच नावाने एक चित्रपट आला होता, ज्यामध्ये अभिनेता संदीप भारद्वाजने त्याची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन राम गोपाल वर्मा यांनी केले होते. शिव राजकुमार, सचिन जे जोशी, लिसा रे आणि जरीन खान सारखे स्टार्सही त्या चित्रपटात दिसले होते. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओ आणि Disney Plus Hotstar वर उपलब्ध आहे. मात्र, द हंट फॉर वीरप्पन या वेब सीरिजबद्दल सांगितले जात आहे की, ही चार भागांची मालिका असणार आहे.