विराट कोहलीची गणना सध्याच्या काळातील महान फलंदाजांमध्ये केली जाते. हा फलंदाज सध्या चांगलाच रंगात आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध डॉमिनिका येथे खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात विराटच्या बॅटमधून धावा निघत आहेत. विराट कोहलीचा हा 500 वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. 500 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा प्रवास पूर्ण करणारा विराट हा भारतातील चौथा फलंदाज आहे, तर तो जगातील 10वा क्रिकेटपटू आहे, ज्याने त्याच्या कारकिर्दीत 500 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आता विराट या सामन्यात सचिनला मागे टाकण्यासाठी सज्ज झाला असून त्याचा पाच वर्षांचा दुष्काळही संपवू शकतो.
IND vs WI : अवघ्या 13 धावा आणि सचिन तेंडुलकरला मागे सोडणार विराट कोहली, संपुष्टात येणार 5 वर्षांची प्रतीक्षा
वेस्ट इंडिज विरुद्ध पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर विराट कोहलीने 87 धावा केल्या आहेत. आपल्या खेळीत त्याने 161 चेंडूंचा सामना केला आणि आठ चौकार मारले. यासह भारताने दुसऱ्या दिवसअखेर चार विकेट गमावून 288 धावा केल्या आहेत.
विराट हा सचिनचे अनेक विक्रम मोडू शकणारा फलंदाज मानला जातो. त्याने यापूर्वीही सचिनचे अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात विराटने शतक झळकावले, तर तो एका बाबतीत सचिनच्या पुढे जाऊ शकतो. सचिन आणि विराटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांची तुलना केली तर दोघांनी 499 सामने खेळून 75 शतके झळकावली होती. या सामन्यात विराटने शतक ठोकले, तर 500 आंतरराष्ट्रीय सामन्यांनंतर शतकांच्या बाबतीत तो सचिनच्या पुढे जाईल. सर्वात जास्त आंतरराष्ट्रीय शतके ठोकण्याच्या बाबतीत विराट सचिननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
याशिवाय विराटने शतक झळकावले, तर यासह त्याचा पाच वर्षांचा दुष्काळ संपुष्टात येईल. विराटने पाच वर्षांपासून परदेशात एकही शतक झळकावलेले नाही. विराटने डिसेंबर 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थमध्ये परदेशी भूमीवर शेवटचे कसोटी शतक झळकावले होते. या सामन्यात विराटने 123 धावांची इनिंग खेळली होती. मात्र यानंतर विराट परदेशी भूमीवर शतक झळकवता आलेले नाही. वेस्ट इंडिजविरुद्ध तो हा दुष्काळ संपवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्याने आणखी 13 धावा केल्या तर हा दुष्काळ संपुष्टात येईल.