इशान किशनवर संतापला रोहित शर्मा, सामन्याच्या मध्यातच काढला राग


इशान किशनने पदार्पणाच्या कसोटी सामन्यातच कर्णधार रोहित शर्माचा मूड खराब केला. सामन्याच्या मध्यावर रोहित त्याच्यावर चिडला. भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज इशानने वेस्ट इंडिजविरुद्ध डोमिनिका कसोटीत पदार्पण केले. टीम इंडियाने मालिकेतील पहिली कसोटी एक डाव आणि 141 धावांनी जिंकली. इशानशिवाय यशस्वी जैस्वालनेही या कसोटीत पदार्पण केले. जैस्वालने 171 धावांची मोठी खेळी केली.

जैस्वालची ही खेळी पाहून कर्णधार रोहितलाही खूप आनंद झाला, मात्र त्यानंतर इशानने त्याचा मूड खराब झाला. त्यानेही इशानवर प्रतिक्रिया देत आपला राग काढला. खरंतर, विराट कोहली 76 धावांवर बाद झाल्यानंतर रोहित डाव घोषित करण्याच्या मूडमध्ये होता. त्याच्या प्रतिक्रियेतूनही ते स्पष्ट दिसत होते. कोहली आऊट झाला, तेव्हा भारताने 405 धावा केल्या होत्या.


भारताने वेस्ट इंडिजवर भक्कम आघाडी घेतली होती, पण तरीही रोहितने डाव घोषित केला नाही. तो वाट पाहत होता आणि ईशान त्याची प्रतिक्षा लांबवत होता. वास्तविक रोहितला इशानने पहिल्या कसोटीत झटपट धावा काढाव्यात अशी इच्छा होती. त्यानंतरच तो डाव घोषित करणार होता, पण इशानला पाहताच त्याचा राग वाढला.

आपल्या स्फोटक फलंदाजीमुळे वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या इशानने पहिली धाव घेण्यासाठी केवळ 20 चेंडू खेळले. त्याची संथ फलंदाजी पाहून रोहितचा संयम सुटला आणि त्याने ड्रेसिंग रूममधूनच रागाने इशानकडे बोट दाखवले. इशानने सिंगल घेताच खाते उघडले. त्याचवेळी रोहितने भारताचा पहिला डाव 5 विकेट्सवर 421 धावांवर घोषित केला. त्याने इशानला क्रीजवर जास्त वेळ घालवण्याची संधी दिली नाही.