साऊथ स्टार प्रभासच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाने लोकांची निराशा केली आहे. प्रभासच्या चाहत्यांना या चित्रपटाकडून खूप आशा होत्या. अशा परिस्थितीत आपल्या चाहत्यांना खूश करण्यासाठी प्रभासने त्याच्या आगामी ‘सालार’ चित्रपटाचा टीझर आणला आहे. ‘सालार’ चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे. दिग्दर्शकाने प्रभासला नव्या अवतारात सर्वांसमोर सादर केले आहे.
Salaar Teaser : अॅक्शनने भरलेला ‘सालार’चा टीझर, प्रभासच्या धमाकेदार एन्ट्रीवर वाजल्या शिट्ट्या
एक मिनिट 40 सेकंदाच्या टीझरवरून असा अंदाज लावला जाऊ शकतो की ‘सालार’ हा अॅक्शनपॅक्ड चित्रपट असणार आहे. जिथे प्रभास अॅक्शन करताना दिसणार आहे. ‘सालार’बद्दल लोक खूप उत्सुक आहेत. प्रभासचा अॅक्शन लूक खूपच प्रभावित करणारा आहे. रिलीज होताच हा टीझर चर्चेचा भाग बनला आहे. त्याचबरोबर या टीझरमध्ये KGF सोबतचे खास कनेक्शन दाखवण्यात आले आहे. हा टीझर रिलीज करण्यासाठी चित्रपटाच्या निर्मात्यांनी पहाटे 5.12 ची वेळ निवडली होती.
या वेळेमागील एक संबंध असेही सांगितले जात आहे की केजीएफमध्ये रॉकी समुद्रात बुडण्याच्या वेळेवर लक्ष केंद्रित केले जाते. त्यावेळीही 5.12 मिनिटे झाली होती. दोन्ही चित्रपटांचे हे कनेक्शन लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. प्रभासचा हा चित्रपट पहिला भाग मानला जात आहे. निर्मात्यांनी याला ‘सालार: सीझफायर’ असे नाव दिले आहे. हा चित्रपट 28 सप्टेंबरला अनेक भाषांमध्ये थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
टीझरच्या सुरुवातीला प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता टिनू आनंद दिसत आहे. ज्यावर इंग्रजीत लिहिले आहे की ‘Tiger, Cheetah, Elephant are very खतरनाक but not in Jurassic Park’. ज्यानंतर प्रभासची धमाकेदार झलक पाहायला मिळते. लोकांना पृथ्वीराजची स्टाइलही आवडू लागली आहे. प्रशांत नीलच्या ‘सालार’मध्ये प्रभासशिवाय श्रुती हासन, पृथ्वीराज सुकुमारन आणि जगपती बाबूही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.