TNPL 2023 : एकट्याने 5 फलंदाजांना पाठवले माघारी, केला सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम


तामिळनाडू प्रीमियर लीगचा थरार कायम आहे. स्पर्धेचा लीग टप्पा संपणार असून प्लेऑफची शर्यत अंतिम टप्प्यात आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक संघ पूर्ण ताकद लावत आहे. चेपॉक सुपर गिलीजही अजूनही या शर्यतीत आहे आणि डावखुरा फिरकीपटू एम सिलंबरासन याने या शर्यतीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सिलंबरासनने टीएनपीएल हंगामातील सर्वोत्तम गोलंदाजी करताना त्रिचीला अवघ्या 71 धावांत बाद गुंडाळले.

TNPL च्या लीग टप्प्यातील या 25 व्या सामन्यात, ज्या चाहत्यांना धावांचा पाऊस पडण्याची अपेक्षा होती, त्यांची निराशा झाली, कारण संपूर्ण सामन्यात केवळ 200 धावा झाल्या. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या चेपॉक सुपर गिलीज संघाला 20 षटकात केवळ 129 धावा करता आल्या. आर सिबीने त्याच्याकडून सर्वाधिक 31 धावा केल्या. त्रिचीकडून गंगा श्रीधर राजूने 4 षटकात 15 धावा देत 3 बळी घेतले.


गिलीजला एवढ्या लहान धावसंख्येचा बचाव करण्यासाठी काहीतरी खास करण्याची गरज होती, जेणेकरून त्रिचीला रोखता येईल. सिलंबरसनने हे काम केले. 24 वर्षीय डावखुरा फिरकीपटूने चालू हंगामात आपला दमदार फॉर्म कायम ठेवला आणि त्रिची संघाचा अर्धा संघ एकट्याने उद्ध्वस्त केला.

त्रिचीचा पुरीचा संपूर्ण संघ केवळ 13.4 षटकेच टिकू शकला आणि केवळ 71 धावांत गारद झाला. सिलंबरसनने यातील 3 षटके टाकली आणि 5 फलंदाजांना आपले बळी बनवले. यामध्ये त्रिचीकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या डॅरिल फेरेरोच्या विकेटचाही समावेश आहे. फेरेरोने 45 धावा केल्या. या जोरावर चेपॉकने 58 धावांच्या मोठ्या फरकाने सामना जिंकला.

मात्र, या विजयानंतरही चेपॉकचे प्लेऑफमधील तिकीट निश्चित झालेले नाही. चेपॉकचा या मोसमातील हा शेवटचा सामना होता. या संघाचे 7 सामन्यात तीन विजयांसह 6 गुण झाले असून ते सध्या चौथ्या स्थानावर आहे. हा संघ अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे, पण त्यांना लीगच्या शेवटच्या दोन सामन्यांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागेल. गुणतालिकेत कोवाई किंग्ज 12 गुणांसह अव्वल स्थानावर आहे.