Bigg Boss OTT 2 : पूजा भट्टने वयाच्या 44 व्या वर्षी कशी केली दारूच्या व्यसनावर मात? बिग बॉसमध्ये केला खुलासा


सलमान खानचा शो बिग बॉस ओटीटी सुरू झाला असून हा शो सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. पुनीत सुपरस्टारला नुकतेच शोमधून बाहेर काढण्यात आले आहे, तर दुसरीकडे, पॅनेलचा एक भाग असलेली अभिनेत्री पूजा भट्ट 13वी स्पर्धक म्हणून शोमध्ये सामील झाली आहे. शोमध्ये पूजा भट्ट खूप स्पष्टपणे बोलत आहे आणि तिने तिच्या आयुष्यातील काळ्या बाजूंबद्दल बोलण्यास संकोच केला नाही. अलीकडेच, अभिनेत्रीने सांगितले की तिने दारूपासून मुक्ती कशी मिळवली.

कॉमेडियन सायरस बरुचासह इतर सहकारी स्पर्धकांसोबतच्या संभाषणात पूजा भट्टने तिच्या दारूबंदीशी लढाईचा उल्लेख केला. ती म्हणाली, मला मद्यपानाची समस्या होती. माझे हे व्यसन माझ्या लक्षात आले आणि मी दारू पिणे बंद करीन असे ठरवले. समाजाने पुरुषांना दारूचे व्यसन आणि त्यातून बाहेर कसे पडायचे याबद्दल बोलण्याचा परवाना दिला आहे. पण या देशात महिला ना उघडपणे दारू पितात किंवा ना त्याच्या व्यसनाबद्दल उघडपणे बोलतात.

मी बिनदिक्कत प्यायची. जेव्हा मी दारूच्या व्यसनापासून मुक्त होण्याचा प्रयत्न करत होते, त्या काळात मी ठरवले की, जेव्हा मी खुलेआम दारू पिते, तेव्हा त्याच्या व्यसनापासून मुक्त होण्याबाबतही खुलेपणाने उल्लेख करेन. या व्यसनातून मुक्त होण्याची माझी कथा सर्वांसोबत शेअर करायची होती. त्या वेळी लोक मला मद्यपी म्हणायचे, तेव्हा मी त्यांना दुरुस्त करून सांगत असे की, मी बरी होणारी मद्यपी आहे.

पूजा भट्ट आज 51 वर्षांची आहे आणि अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, ती 44 वर्षांची असताना तिने दारूचे व्यसन सोडले. आता अभिनेत्री यापासून चार हात लांबच राहते. पूजा भट्ट ही प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांची मुलगी असून तिने मोठ्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या शेवटच्या काही भूमिकांबद्दल सांगायचे तर, ती बॉम्बे बेगम्स, सडक 2 आणि चुप या चित्रपटांचा भाग होती.