सुपरस्टार प्रभासच्या आदिपुरुष या चित्रपटाने चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. चित्रपटातील संवादांवरून गदारोळ निर्माण झाला आहे. आदिपुरुषवर सोशल मीडियावरही जोरदार टीका होत आहे. लोक आपला राग काढत आहेत. प्रभासचा हा चित्रपट पाहून भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीही रागाने लाल झाला आहे. त्यालाही या चित्रपटातील संवाद आवडलेले नाहीत. चित्रपटातील डायलॉग्स ऐकून त्याला राग आला आहे, अशा स्वरुपाच्या काही बातम्या सोशल मीडियावर पसरत आहेत.
Virat Kohli on Adipurush : आदिपुरुषचे डायलॉग ऐकून विराट कोहली संतापला! काय आहे व्हायरल व्हिडिओचे सत्य?
इतकेच नाही तर भारतीय क्रिकेटपटूंच्या नावाच्या पोस्टही व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये आदिपुरुषच्या संवादांवर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. असेही बोलले जात आहे की कोहलीने पहिल्याच दिवशी हा चित्रपट पाहिला आणि त्याला हा चित्रपट अजिबात आवडला नाही आणि त्यानंतर त्याने ट्विट केले.
what is this….. 🤬😡😡😡 #OmRaut #AdipurushReview #Adipirush #AdipurushDisaster #BoycottBollywood #Ashes23 #BoycottAdipurush #BoycottWickes #DelhiRains #LustStories2 #Prabhas #Sita Hanuman Lord Ram pic.twitter.com/mAZxZBbrfy
— Virat Kohli (@imVKohli___18) June 16, 2023
कोहलीच्या नावाने आदिपुरुषचा रिव्ह्यू व्हायरल होत आहे. चित्रपटासंदर्भात त्याच्या नावाने काय व्हायरल झाले आहे हे जाणून घेण्यासोबतच, व्हायरल पोस्टचे सत्य काय आहे हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे, कारण अनेक सत्यापित खात्यांनी त्याच्या नावाने व्हायरल पोस्ट रिट्विट देखील केली आहे. खरं तर, भारतीय क्रिकेटपटूने या चित्रपटाचे पुनरावलोकन केले नाही किंवा त्याच्या संवादांवर भाष्य केलेले नाही.
कोहलीच्या नावाच्या ट्विटर अकाउंटवर चित्रपटाचे काही व्हिडिओ शेअर केले आहेत. हे काय आहे, असेही सांगण्यात आले. यासोबतच संतप्त इमोजीही शेअर करण्यात आले होते. अनेक वापरकर्त्यांनी ती कोहलीची पोस्ट आहे, असे समजून त्याच्या नावाने रिट्विट करण्यास सुरुवात केली.
दरम्यान कोहलीच्या नावाने व्हायरल होत असलेले ट्विट त्याचे मूळ खाते नाही. 6 जूनपासून त्याच्या व्हेरिफाईड अकाउंटवरून एकही पोस्ट शेअर केलेली नाही.