The Trial Trailer : काजोलच्या कारकिर्दीतील सर्वात कठीण ट्रायल, ट्रेलरमध्ये दिसून आला दमदार अभिनय


बॉलिवूड अभिनेत्री काजोल सध्या तिच्या नवीन वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. तिच्या द ट्रायल या वेब सिरीजचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ही अभिनेत्री गेल्या काही काळापासून प्रभावी भूमिकांमध्ये दिसत आहे आणि तिची ही भूमिकाही तशीच आहे. यामध्ये ती वकिलाच्या भूमिकेत आहे. अभिनेत्रीने स्वतः या वेब सीरिजचा ट्रेलर चाहत्यांशी शेअर केला आहे.

काजोलने इंस्टाग्रामवर द ट्रायलचा ट्रेलर रिलीज केला आहे, ज्यामध्ये ती तिच्या अभिनयाने चाहत्यांना प्रभावित करताना दिसत आहे. यावेळी अभिनेत्री या चित्रपटातून सत्याचे समर्थन करणार असून आपल्या युक्तिवादाच्या जोरावर विरोधकांवर हल्लाबोल करताना दिसणार आहे. ट्रेलरमधून चित्रपटाची स्टोरी लाईन समोर येत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.

यात काजोलचा प्रियकर तिची कशी फसवणूक करतो आणि दोघांमध्ये अंतर येते, हे दाखवण्यात आले आहे. पण काळाचे चक्र फिरते आणि काजोलच्या जुन्या प्रियकराला एका केसच्या संदर्भात तिची मदत हवी असते. अशा परिस्थितीत काजोल त्याला मदत करते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. ट्रेलरमध्ये अभिनेत्री तिच्या डायलॉग डिलिव्हरीने प्रभावित करताना दिसत आहे.

इंस्टाग्रामवर ट्रेलर शेअर करण्यासोबतच काजोलने कॅप्शनमध्ये लिहिले – खटला केवळ कोर्टरूममध्येच नाही, तर आयुष्यातही होतो. नोयोनिका सेन गुप्ताच्या आयुष्यातील सर्वात कठीण ट्रायल पहा. द ट्रायल – प्यार खून धोका डिस्ने प्लस हॉटस्टारवर 14 जुलैपासून रिलीज होईल.

दरम्यान अभिनेत्रीकडे सध्या आणखी एक मोठा प्रोजेक्ट आहे. काही काळापूर्वी तिच्या लस्ट स्टोरीज या चित्रपटाचा टीझरही रिलीज झाला आहे. यामध्ये काजोलची भूमिका कशी असेल याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.